कलरफुल सई ताम्हणकर म्हणतेय ‘हो जा रंगीला रे’, पाहा सईचे सहा ग्रॅलमरस फोटो


सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री. नुकतेच तिने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. त्यातले काही फोटो तिने तिच्या फॅन्ससाठी शेयर केले आहे.

‘हो जा रंगीला रे…लिहीत हे फोटो तिच्या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट केले.

पांढरा शर्ट आणि त्यावर रंगीत ट्राऊझर घातलेली सई, या फोटोंमध्ये सई अतिशय आकर्षक दिसते.

सईच्या या नवीन फोटोंना फॅन्सकडून भरभरून लाइक्सची पोचपावती मिळत आहे.

सई नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ती बऱ्यापैकी सोशल मीडियावर सक्रिय असते.

सई नेहमी तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करत असते. प्रभावी अभिनय करणारी सई मराठीसोबतच हिंदी सिनेमासृष्टीतही सक्रिय आहे.

सध्या सई सोनी मराठीच्या हास्यजत्रा या कार्यक्रमात जज म्हणून दिसत आहे.

लवकरच ती ललित प्रभाकरसोबत कलरफुल सिनेमात दिसणार आहे

शिवाय ती हिंदीमध्ये क्रिती सॅनॉनसोबत ‘मिमी’ या सिनेमातही झळकणार आहे.

सई मराठीमधली सर्वात बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.


Leave A Reply

Your email address will not be published.