Wednesday, April 17, 2024

हॉलिवूड अभिनेते असलेल्या फ्रेड वार्ड यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन

सध्या हॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी येत आहे. ‘ट्रेमर्स’ आणि ‘हेनरी एंड जून’ आदी चित्रपटांमधून प्रेक्षकांमध्ये आपली दामोदर ओळख निर्माण करणारे अभिनेते फ्रेड वार्ड यांचे दुःखद निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. फ्रेड वार्ड यांचे प्रवक्ता असणाऱ्या रॉन हॉफमॅन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. मात्र फ्रेड वार्ड यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. सॅनडिएगोमध्ये जन्मलेल्या फ्रेड वार्ड यांनी जवळपास चार दशकांपेक्षा जास्त काळ हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. त्यांनी त्यांच्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये अनेक अशा चित्रपटांमध्ये काम केले ज्यातील भूमिकांमुळे आजही प्रेक्षक त्यांना ओळखतात. फ्रेड वार्ड यांना नुकतेच एचबीओच्या ‘ट्रू डिटेक्टिव’च्या दुसऱ्या पर्वात एडी वेलकोरो या भूमिकेत पाहण्यात आले होते. या शोमध्ये त्यांनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

फ्रेड वार्ड यांना अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या गोल्डन ग्लोब या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. रॉबर्ट ऑल्टमॅन यांच्या ‘शॉर्ट कट्स’ या चित्रपटासाठी त्यांना वेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. याशिवाय त्यांनी ‘रेमो विलियम्स: द एडवेंचर बिगिन्स’मध्ये रेमोची भूमिका साकारली होती.

‘शॉर्ट कट्स’ आणि एलन रूडोल्फ यांच्या ‘इक्विनॉक्स’मध्ये फ्रेड वार्ड यांच्यासोबत काम करणाऱ्या मैथ्यू मोडिन यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत ट्विट केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “माझा मित्र असलेल्या फ्रेड वार्डच्या निधनाच्या बातमीमुळे मी स्तब्ध झालो आहे.” तर अभिनेते केट मुलग्रे यांनी देखील ट्विट करत फ्रेड वार्ड यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. “मी फ्रेड वार्डच्या निधनामुळे अतीव दुखत आहे. रेमो विलियम्समध्ये एकत्र काम करतांना त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूपच करुणा दिसली. ते खूपच सभ्य, विनम्र आणि कामाप्रती निष्ठा असणारे होते. त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक हास्य असायचे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा