आनंदाची बातमी! दोन महिन्याआधी आई झालेल्या एंबर हर्डने दाखवली मुलीची पहिली झलक


काही कलाकार त्यांचे वैयक्तिक आयुष्य जपण्यासाठी मीडियासमोर कधीही जास्त वैयक्तिक गोष्टी बोलत नाहीत. सोशल मीडियावरही असे कलाकार त्याच्या वैयक्तिक गोष्टी पोस्ट करत नाहीत. तसं पाहिलं, तर कलाकार सहसा त्यांच्या बाळांचे फोटो पोस्ट करत नाहीत. बॉलिवूडमध्ये असणारा हा प्रकार हॉलिवूडमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. हॉलिवूडचे कलाकार देखील त्यांच्या बाळांचे फोटो सोशल मीडियावर लवकर पोस्ट करत नाहीत.

हॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री एंबर हर्ड हिने दोन महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. एंबरने दोन महिन्यानंतर तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. एंबरने ८ एप्रिल, २०२१ ला मुलीला जन्म दिला होता. मात्र, दोन महिने तिने तिच्या मुलीला जगापासून लांब ठेवले होते. एंबरने दोन महिन्यानंतर आई झाली असल्याची घोषणा करत मुलीचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये एंबर हर्डवर अतिशय प्रेमाने तिची मुलगी झोपली आहे. एंबरने सरोगसीचा माध्यमातून या मुलीला जन्म दिला आहे. एंबरने हा सुंदर फोटो पोस्ट करत लिहिले की, “मी तुम्हा सर्वांसोबत एक बातमी शेअर करण्यासाठी खूपच उत्साहित आहे. साधारण चार वर्षांपूर्वी मी एक निर्णय घेतला होता की, मला मूल जन्माला घालायचे आहे. मी हे काम माझ्या अटी आणि शर्तींवर करू इच्छित होती. मी या गोष्टीसाठी खरंच खूप कौतुक करते की, स्त्रियांच्या रूपात आपल्या नशिबातील सर्वात मोठा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे आई होणे. या गोष्टीसाठी माझा हा क्रांतिकारी विचार होता. मला अशा आहे की आपण एका अशा ठिकाणी पोहोचू शकतो, जिथे घरात पाळणा ठेवण्यासाठी कोणत्या अंगठीची गरज नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यावर कोणाचा काहीही हक्क नाही. माझ्या मुलीचा जन्म ८ एप्रिल, २०२१ ला झाला. तिचे नाव ओनाघ पैगे हर्ड असून, आता तीच माझ्या उरलेल्या जीवनाची सुरुवात आहे.”

मागील काही काळापासून एंबर हर्डच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. एंबर हर्डने तिचा पहिला नवरा असलेल्या आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेपवर मारहाणीच्या आणि घरगुती हिंसेचे आरोप लावले होते. यासोबतच तिने आणखी बरेच गंभीर आरोप त्याच्यावर लावले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.