प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या महान विनोदी अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप


प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आणि हास्य कलाकार क्लोरीस लीचमॅन यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. क्लोरीस यांनी बुधवारी कॅलिफोर्नियाच्या त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी आणि कलाकारांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

क्लोरीस यांच्या निधनाची बातमी त्यांच्या प्रसिद्धी प्रमुखांनी दिली आहे. क्लोरीस यांचे पीआर जूलियट ग्रीन यांनी सांगितले की, “क्लोरीस यांच्यासोबत काम करणे मी माझे सौभाग्य आहे. क्लोरीस ह्या आमच्या काळातील सर्वात निडर अभिनेत्री होत्या. त्यांच्यासारखे दुसरे कोणीच नव्हते. एका नजरेतच त्या तुम्हाला प्रेमात पडू शकत होत्या किंवा खळखळून हसवू शकत होत्या, इतकी क्षमता त्यांच्यात होती. क्लोरीस पुढे काय बोलतील याचा अंदाज कोणीच लावू शकत नव्हते. त्या अतिशय प्रतिभा संपन्न कलाकार होत्या.”

क्लोरीस लीचमॅन ह्या ९० च्या दशकातील उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. त्यांनी मेल ब्रूक्स यांच्या तीन कॉमिक चित्रपटांमध्ये काम केले होते. वयाच्या ८२ व्या वर्षी त्या डांसिंग विद द स्टार्स नावाच्या एका स्पर्धेत स्पर्धक म्हणून देखील सहभागी झाल्या होत्या. २०१९ साली आलेल्या ‘मॅड अबाउट यू’ या विनोदी मालिकेत देखील त्या दिसल्या होत्या.
क्लोरीस यांनी ‘द मॅरी टायलर मूर शो’ आणि अजून काही टीव्ही कार्यक्रमांसोबतच ‘द लास्ट पिक्चर शो’साठी अकादमी पुरस्कार देखील जिंकला आहे. सोबतच त्यानी २०१९ आणि २०२० सलत दोन चित्रपटनमध्ये काम केले मात्र हे सिनेमे अजून प्रदर्शित झाले नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.