‘प्रियांकाला पहिल्यांदाच पाहाताच तिच्या पडले होते प्रेमात’, दिग्गज अभिनेत्रीने केला खुलासा


प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. प्रियांकाचे भारतात जितके चाहते आहेत तितकेच परदेशातही आहे. तिच्या यशस्वी चित्रपट कारकीर्दीत, प्रियंका बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तसेच, ती भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

नुकतेच हॉलिवूड स्टार ड्र्यू बॅरीमोरने म्हटले आहे की, जेव्हा ती पहिल्यांदा प्रियांका चोप्राला भेटली, तेव्हाच ती प्रियांकाच्या प्रेमात पडली होती. तिने सांगितले की, तिला प्रियंकाने लिहलेले ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तकदेखील आवडते. “प्रियंकाला पहिल्यांदा पाहताच मी तिच्या प्रेमात पडले आणि मला तिचे पुस्तकही खूप आवडते”, असेही ती म्हणाली. या कौतुकामुळे प्रियांका चोप्रा मात्र खूप खुश होणार आहे.

जेव्हा प्रियंका बॅरीमोरच्या ‘द ड्र्यू बॅरीमोर शो’ मध्ये सामील झाली तेव्हा बॅरीमोर म्हणाली, “पुस्तकाच्या माध्यमातून प्रियंकाने बरीच चांगली आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः तो भाग ज्यात तुम्ही आणि निक प्रेमात पडलात आणि तुम्ही खूप विलासी आणि विलक्षण जीवन जगले. तुमच्या आयुष्यातील कोणत्या बाबीबद्दल मी अधिक बोलावे हे निवडणे माझ्यासाठी खूप कठीण आहे.”

अलीकडेच ड्र्यू बॅरीमोर म्हणाली की, तिच्यासाठी वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवणे खूप महत्वाचे आणि रोमँटिक आहे. बॅरीमोरच्या म्हणण्यानुसार स्वयंपाक करणे तिला खूप आवडते. तसेच ती शाळेत नाही जात म्हणून ती वाचन करत असते. ती खूप अभ्यासही करते.

प्रियंका चोप्राबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री नुकतीच ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटात दिसली होती. लग्नानंतर प्रियंकाने बॉलिवूडमध्ये तिचा पहिला चित्रपट ‘द स्काई इज पिंक’ केला, ज्याला जास्त यश मिळाले नाही. आता निक जोनसशी लग्नानंतर अभिनेत्री जवळपास परदेशात शिफ्ट झाली आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत राहते.


Leave A Reply

Your email address will not be published.