Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बेशरम रंग’ गाण्यावर शेवटी हनी भाऊ बोललाच! ‘पूर्वी स्वातंत्र्य होते….

मोस्ट अवेटेड चित्रपट पठाण स्टारर अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या बेशरम रंग गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. त्याशिवाय अनेक राजकारणी आणि हिंदू संघटानाने दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे चित्रपटाला बॉयकॉट करण्यात येत आहे. याच मुद्द्यावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिकिया व्यक्त करत शाहरुखला पाठिंबा दिला आहे. नुकतंच बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंग याने आपले मौन तोडले आहे.

शारुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट पठाण (Pathan) सध्या वादाच्या घेऱ्यात अडकला आहे. बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यापासून चित्रपटाला बॉयकॉट करण्याता येत आहे. दीपिकाने भगव्या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे या वादाला चालाना मिळाली. यानंतर याचा फायदा अनेक राजकारणी आणि हिंदू संघटानांनी उचलला. त्याशिवाय सोशल मीडियावप चित्रपटाला बॉयकॉटची मोहिमही सुरु केली आहे. आता या मुद्द्यावरुन यो यो हमी सिंग (Yo Yo Honey Singh) याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याच्या मते आजच्या काळात लोकं कोणत्याही गोष्टीला हळव्या रुपाने घेत असतात.

हनी सिंग याने नुकत्या दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “पूर्वी खूप स्वातंत्र्य होते. भले लोक कमी शिकलेले होते मात्र, त्यापेक्षाही जास्त समजदार होते. ते बुद्धिमतेने सजदार होते त्याशिवाय मनोरंजनाला त्याच रुपाने पाहायचे. ते लोकं गोष्टींना मनावर घेत नसत. ‘रुक्मिणि रुक्मिणि शादी के बाद क्या क्या हुआ’ लोकांनी या गाण्याला मान्य केलं असून लोकांच्या पसंतीस उतरलं होतं.”

हनी सिंगने पुढे सांगितले, “मी या गाण्याला ऐकतच मोठा झालो आहे, पण जेव्हा मी अशा लिरिक्स बनवल्या तेव्हा लोकांनी त्याला विरोध करण्याला सुरुवात केली. आता तर याच्यापेक्षाही खरब परिस्थिती झाली आहे. लोकं खूपच हळवे झाले आहेत. मला नाही माहित असं का आहे. हे तर फक्त मनोरंजन आहे.” हनी सिंगने कोणाचेही मन न दु:खवता खुप चांगल्याप्रकारे स्वत:चे मत व्यक्त केलं आहे. त्याशिवया त्याने पूर्वीच्या लोकांचे कौतकही केले. भले ते शिकलेले नव्हते मात्र त्यांच्याकडे बुद्धी होती. जर आजच्या काळात कोणी ‘चोली के पिछे क्या है’ जर बनवलं असतं तर लोकांनी त्याच्यावरही वाद निर्माण केला असता. या गोष्टींचा विचार पाडण्यास अभिनेत्याने भाग पाडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ दोन अभिनेत्यांनी ‘नायक’ला होकार दिला असता, तर अनिल कपूरांचा झाला असता पत्ता कट
‘आपल्यामुळे आई- वडिलांच्या डोळ्यात आनंद…’, म्हणत भरत जाधवने दिल्या विमान प्रवासाच्या जुन्या आठवणींना उजाळा

हे देखील वाचा