नुसतं नावाला करोडपती! केबीसीमध्ये करोडो रुपये मिळूनही तुम्ही असताय लखपती, कसे ते वाचा


‘कौन बनेगा करोडपती’ हा भारतीय दूरचित्रवाणीवरचा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय रियालिटी गेम शो. प्रश्नमंजूषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास दहा हजारापासून ते सात कोटी रुपयांपर्यंतचे बक्षिसे दिली जातात. मागील दोन पेक्षा जास्त दशकांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रश्नमंजुषा असलेल्या या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन यांच्या खुमासदार सूत्रसंचलनाने चार चाँद लागतात.

अनेक सामान्य, अतिसामान्य लोकांच्या स्वप्नांना नवी दिशा, नवी ओळख आणि नवे पंख देणारा हा शो अगदी कमी वेळात हॉटसीटवर बसलेल्या माणसाचे नशीब बदलतो. मात्र तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल एक गोष्ट माहित आहे का? या कार्यक्रमात तुम्ही कितीही पैसे जिंकले तरी त्या जिंकलेल्या पैशातून काही रक्कम टॅक्स म्हणून कापली जाऊन, तुमच्या हातात काही ठराविक रक्कमच येते.

अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉटसीटवर बसण्यासाठी स्पर्धकांना फास्टेस्ट फिंगर फर्स्ट हि फेरी पार करावी लागते. त्यानंतर तुम्ही हॉटसीटवर येतात. तुम्ही हॉटसीटवर बसल्यावर एक करोड रुपये जिंकलात तर तुम्हाला पूर्ण एक करोड रुपये कधीच मिळत नाही. त्यातली काही रक्कम ही टॅक्स म्हणून कापली जाते.

भारतीय इन्कम टॅक्स कायदयाच्या १९४ ब या कलमांतर्गत तुम्ही लॉटरी किंवा रियालिटी शो मधून जी रक्कम जिंकता त्यावर तुम्हाला ३३ टक्के कर हा भारत सरकारला द्यावा लागतो. म्हणजेच जर तुम्ही १ करोड रुपये जिंकलात तर त्यातील जवळपास ३० टक्के रकमेचा तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतो. याच ३० टक्के रकमेवर सरचार्ज लागतो १० टक्के. तर ४टक्के सेस मिळून तुमच्या पारड्यात १ कोटी रुपयांपैकी येतात केवळ ६५ लाख, ६८ हजार ८०० रुपये.

टॅक्स मध्ये जेवढी रक्कम वजा होते त्यात पुणे मुंबई शहरात एखादे वन आरके किंवा बीएचके घर येऊ शकते. म्हणूनच म्हणताना तुम्ही नक्कीच करोडपती असाल मात्र प्रत्यक्षात तुमच्या हातात काही लाख रुपये असतील.


Leave A Reply

Your email address will not be published.