80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर या काळात, 1985 मध्ये, एक अशी मालिका पडद्यावर आली जिने विनोदाचा अर्थच बदलून टाकला. ही मालिका इतकी प्रभावी होती की 41 वर्षांनंतरही तिची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही.
या क्लासिक विनोदी मालिकेचे नाव म्हणजे ‘इधर उधर’ आहे. या मालिकेची कथा आणि सादरीकरण उत्तम होतेच पण तसेच स्टारकास्ट ही उत्तम होती. तर आता या मिलीकेतील वैशिष्ट्य म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेत्री आणि खऱ्या आयुष्यातील बहिणी, रत्ना पाठक शाह आणि सुप्रिया पाठक, (pathak)पहिल्यांदाच एकत्र दिसल्या होत्या. तर त्यांची टायमिंग आणि केमिस्ट्री इतकी अचूक होती की प्रेक्षक त्यांच्या अभिनयाने मंत्रमुग्ध झाले होते.
‘इधर उधर’ची कथा मुंबई या स्वप्ननगरीत आपल्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुण नोकरदार महिलांभोवती फिरते. तर कथा प्रेक्षकांना प्रंचड भावली ती कथा अनेक जणांना आपलीशी वाटत त्यामुळे ती अधिक लोकप्रिय ठरली. तर आजही या मालिकेला IMDb वर तिचे रेटिंग 8.6 आहे.
संजय दत्त अभिनित आखिरी सवाल चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल; जाणुन घ्या थिएटरमध्ये कधी येणार?










