आखिरी सवाल हा चित्रपट रिलीज पूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर झाला अत्यंत उत्तम, भव्य, आणि उत्सुकता निर्माण करणारा चित्रपट असल्याचे दिसून येते. तर हा चित्रपट आता एका कारणामुळे चर्चेत आला आहे ते म्हणजे ८ मे रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली. तर या चित्रपटाची रीलीज डेट बदलली आहे. तर हा चित्रपट 15 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘आखिरी सवाल’ हा चित्रपट संजय (sanjay)दत्त आणि समीरा रेड्डी अभिनीत आहे. तर या चित्रपटाचे निर्मात्यांनी गुरुवारी या चित्रपटाची तारीख रीलीज केली. पण आता प्रेक्षकांची आजुन उत्सुकता वाढत आहे. तर हा चित्रपट सिनेमागृहात यशस्वी ठरतो का हे पाहण्याजोगे राहील. हा चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या इतिहासावर आधारित आहे.
‘आखिरी सवाल’ या चित्रपटाची निर्मिती निखिल नंदा मोशन पिक्चर्सने केली आहे. तो निखिल नंदा यांनी सादर केला आहे. याची निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली असून, पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंग, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद हे सह-निर्माते आहेत. संजय दत्त हे नुकतेच रीलीज झालेल्या रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिसला होता. तसेच संजय दत्तने आता पर्यत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. आणि त्यामुळेच त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तर आता त्याचे चाहाते त्याचा आगमी चित्रपट आखरी सवाल याची वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










