Sunday, December 3, 2023

मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच इलियाना डिक्रूझ गेली आऊटिंग, फोटो केले सोशल मीडियावर शेअर

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana dcruz)आजकाल तिच्या मातृत्वाचा खूप आनंद घेत आहे. त्यामुळे आता तिचे सगळे लक्ष तिच्या मुलावर आहे .आई होण्याचा अनुभव ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. ती अनेकदा तिच्या प्रिय कोआ फिनिक्स डोलनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

पहिल्यांदाच ती आपल्या मुलासोबत आऊटिंगला गेली आहे. खुद्द इलियानाने ही माहिती दिली आहे. त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये इलियानाने तिच्या मुलाला स्ट्रोलरमध्ये झोपवले आहे आणि ती खाली वाकून त्याच्याकडे पाहत आहे. हे शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बेबी आणि आई पहिल्यांदा लंचसाठी बाहेर गेले आहेत..’ यादरम्यान इलियाना एकदम फिट दिसत होती. तिने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर डेनिम शर्ट आणि कॅप घातली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पत्नीसोबत खुलेआम रोमान्स करताना दिसराला राजकुमार राव, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हरायल
दिव्यांका त्रिपाठीसोबतच्या वादाबाबत करण पटेलने पहिल्यांदाच तोडले मौन; म्हणाला,’आमच्या दोघांचे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे’

हे देखील वाचा