सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींचे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. याचे बहुतांश कारण म्हणजे अभिनेत्रींचा ड्रेसिंग सेन्स. अभिनेत्री इलियाना डिक्रूझचा (Ileana D’cruz)असाच एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचा बॉडीशेपर स्पष्टपणे दिसत आहे. म्हणजे इतर अभिनेत्रीप्रमाणे इलियानाही Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
घातला पारदर्शक ड्रेस!
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये इलियाना डिक्रूझने जांभळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस परिधान केला आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीचा ड्रेस समोरच्या बाजूने झाकलेला आहे, तर मागच्या बाजूने बॅकलेस आहे. विशेष बाब म्हणजे, या फोटोमध्ये मागील बाजूने अभिनेत्रीचा बॉडीशेपर स्पष्ट दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये अभिनेत्रीची फिगर थोडी विचित्र दिसत आहे, त्यामुळे हे फोटो युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे.
मेकअप होता परफेक्ट
या फोटोमध्ये इलियानाने लाल रंगाची गडद लिपस्टिक लावली आहे. यासोबत ड्रेसवर मॅचिंग कानातले घातले होते, तर केस तिने शॉर्ट ठेवली होती.
बॉडीशेपर दिसल्यामुळे झाली Oops Momentची शिकार!
या फोटोमध्ये पारदर्शक ड्रेसमुळे अभिनेत्री उप्स मूमेंटची शिकार झाली. याचे मुख्य कारण म्हणजे, तिचे बॉडीशेपर. समोर आलेल्या फोटोमध्ये, मागील बाजूचा बॉडीशेपर पारदर्शक ड्रेसमध्ये कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आणि अभिनेत्री उप्स मूमेंटची शिकार झाली.
इलियानाचे चित्रपट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर इलियाना शेवटची ‘द बिग बुल’ चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने मीरा राव नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होता. इलियाना डिक्रूझ लवकरच ‘अनफेअर अँड लव्हली’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय इलियाना रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात देखील दिसणार आहे. विद्या बालन आणि प्रतीक गांधी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा :
नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान