भारीच ना! पंड्या, अश्विन आणि कुलदीपनंतर आता ‘वाथी कमिंग’ गाण्यावर थिरकल्या भारतीय महिला क्रिकेटर्स, व्हिडिओ तर पाहा


भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू एवढे व्यस्त असतात की, त्यांना स्वत:साठी खास असा वेळ कधी मिळत नाही. पण जेव्हा त्यांना वेळ मिळतो, तेव्हा मात्र ते भरभरून एंजॉय करताना दिसतात. असाच क्रिकेटपटूंचा एंजॉय करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने मंगळवारी (9 मार्च) लखनऊ येथे झालेल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाला 9 विकेट्सने पराभूत केले. या विजयानंतर संघातील सर्व महिला खेळाडूंनी चांगलेच एंजॉय केले आहे. महिला खेळाडूंनी दाक्षिणात्य भारतीय चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार विजयच्या ‘मास्टर’ चित्रपटातील ‘वाथी कमिंग’ या गाण्यावर डान्स केला आहे. या गाण्यावर केलेला खेळाडूंचा डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये वेदा कृष्णमूर्ती, आकांशा कोहली, दिव्या ज्ञानानंद, वनिथा व्हीआर, ममता माबेन या खेळाडूंनी ठुमके मारले आहे. यामध्ये त्या खूपच मजा मस्ती करताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओला क्रिकेट प्रेमींकडून खूपच प्रेम मिळत आहे. हा व्हिडिओ महिला संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहे.

याआधी भारतीय क्रिकेट पुरुष संघातील फिरकीपटू आर अश्विन याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान इंस्टाग्रामवर जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता.

ज्यामध्ये तो चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यासोबत ‘वाथी कमिंग’ गाण्यावर थिरकला होता. याच गाण्यावर क्रिकेट संघातील धाकड महिलांनी देखील डान्स केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: मौनी रॉयने मैत्रिणीसोबत लावले ‘शावर’ गाण्यावर ठुमके, अदा पाहून चाहतेही घायाळ

-शूटिंग दरम्यान चाहत्यांची गर्दी, वैतागलेल्या अवस्थेतही वरुणने अत्यंत प्रेमाने केली विनंती, व्हिडिओ व्हायरल

-राखी सावंत बनली ‘नागिन’, पाहा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेत्रीचा अवतार


Leave A Reply

Your email address will not be published.