×

लग्नानंतर पारंपरिक महाराष्ट्रीयन लूकमध्ये सायली कांबळेने नवऱ्यासोबत दिल्या रोमँटिक पोज, फोटो झाले व्हायरल

इंडियन आयडलचे बारावे पर्व तुफान गाजले. या पर्वात सहभागी झालेले सर्वच स्पर्धक शो संपण्याच्या आधीच सेलिब्रिटी झाले. त्यातही शोच्या अंतिम स्पर्धेत पोहचलेले पाचही स्पर्धक सध्या तुफान गाजत आहे. याच पाचपैकी एक स्पर्धक असणारी गायिका सायली कांबळे सध्या तिच्या लग्नामुळे खूपच गाजत आहे. सायलीने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड असलेल्या धवल पाटीलसोबत लगीनगाठ बांधली. सायलीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर सायलीने तिच्या नववधूच्या रुपातले लग्नानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सायली कमालीची सुंदर दिसत आहे.

सायलीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली असून, त्यावर मंगळसूत्र, दागिने, मेहेंदीच्या हातांमध्ये असलेला भरजरी हिरवा चुडा, केसांचा अंबाडा, त्यावर लावलेला अंबाडा, भांगेत कुंकू आणि चेहऱ्यावर नववधूचे तेज. या पारंपरिक महाराष्ट्रीय रूपात सायली कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत असून, या लूकमध्ये खुललेले रूप सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सायलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका फोटोमध्ये ती तिच्या नवर्याच्या धवलच्या मिठीत असून त्या दोघांची जोडी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sayli Kamble (@saylikamble_music)

सायलीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यावर तिचे फॅन्स आणि नेटकरी एकापेक्षा एक कमेंट्स करत तिचे कौतुक करून त्या दोघांना आशीर्वाद देताना दिसत आहे. सायलीच्या या नव्या लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत. हे फोटो शेअर करताना सायलीने कॅप्शनमध्ये लिहिले, “मिसेस धवल पाटील” यासोबतच तिने एक हार्ट ईमोजी देखील पोस्ट केला आहे. सायलीने मागच्यावर्षी डिसेंबरमध्ये धवलसोबत साखरपुडा केला होता. त्यांच्या प्रपोजलपासून, साखरपुडा, प्री वेडिंग ते लग्नापर्यंत सर्वच फोटो सोशल मीडियावर तुफान गाजले.

सायलीच्या लग्नाला तिच्या इंडियन आयडलमधील सर्वच सहस्पर्धकांनी हजेरी लावली होती. विविध देशांमध्ये जाऊन शो करणारे हे स्पर्धक सध्या सिंगिंग सुपरस्टार ज्युनियर या रियॅलिटी शोमध्ये मेंटॉर म्हणून काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post