इनसाइड एजचा तिसरा सिझन ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


अमेझॉन प्राईमची फलेंगशिप सिरीज ‘इनसाइड एज’ च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. या सिरीजच्या तिसऱ्या पर्वाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘इनसाइड एज’मध्ये विवेक ओबेरॉय, रिचा चड्ढा आणि आमिर बशीर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिरीजच्या तारखेच्या घोषणेसह या तिन्ही कलाकारांच्या भूमिकांना देखील दाखवण्यात आले आहे.

‘इनसाइड एज’ च्या तिसऱ्या पर्वाला अमेझॉन प्राईमवर ३ डिसेंबरपासून स्ट्रीम होणार आहे. करण अंशुमन क्रिएटेड आणि कनिष्क शर्मा दिग्दर्शित हे पर्व इतर दोन पर्वांपेक्षा भव्य आणि जास्त आकर्षक असणार आहे. इनसाइड एज क्रिकेटमधील सत्यावर आधारित असलेला या सिरीजचे १० भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यात सत्ता आणि लालच याच उत्कंठावर्धक गेम प्रेक्षक बघतील.

अमेझॉन प्राईम व्हिडिओ इंडियाची हेड ऑफ इंडिया ओरिजनल्स अपर्णा पुरोहित यांनी सांगितले की, “आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळालेली ही सिरीज भारतातील पहिली अशी सिरीज आहे, जिचे खूप कौतुक होत असून सर्वच लोकं या सिरीजवर स्तुतिसुमन उधळत आहेत. अनेक ट्विस्ट आणि टर्न्सने परिपूर्ण असणाऱ्या या सिरीजचे नवे पर्व भरपूर ड्रामा आणि रहस्यांनी भरलेले आहे. ज्यातून अनेक विविध खुलासे होती.”

एक्सेल मीडियाच्या रितेश सिधवानी यांनी अंगितले की, “इनसाइड इजला प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे खूप प्रेम मिळाले असून, आम्हाला हा अतिशय रोमांचकारी सिझन सादर करताना खूपच आनंद होत आहे. इनसाइड इजची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे. ‘इनसाइड एज’ ही सिरीज ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत असून, तिचे दहा भाग असणार आहेत. ही सिरीज थेट मनी हाइस्टच्या पाचव्या पर्वाला टक्कर देणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विकीच्या एक्स गर्लफ्रेंडने लावले कॅटरिनाच्या ‘या’ गाण्यावर ठुमके, बेली डान्सवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

-सरावादरम्यान मांजरीसोबत खेळताना दिसला विराट, पत्नी अनुष्काने कमेंट करताच म्हणाला, ‘…मुंबईची मांजर’

-राजकुमार अन् पत्रलेखाच्या लग्नातील खास व्हिडिओ व्हायरल, केमिस्ट्री पाहून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव


Latest Post

error: Content is protected !!