Monday, October 2, 2023

फ्लॉप ‘Adipurush’ सिनेमाची फुल अँड फायनल कमाई आली समोर, प्रभासला मात्र एका गोष्टीचे समाधान

‘बाहुबली’ फेम सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या ‘आदिपुरुष‘ सिनेमाच्या कमाईमुळे चर्चेत आहे. मागील महिन्यात त्याचा ‘आदिपुरुष’ सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाकडून निर्मात्यांना भरपूर अपेक्षा होत्या, पण सिनेमा प्रभासच्या कारकीर्दीवर सकारात्मक प्रभाव पाडू शकला नाही. उलट सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. अशात जगभरात प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाचे अखेरचे कलेक्शन समोर आले आहे. यासोबतच सिनेमाची ओटीटी रिलीज तारीखही समोर आली आहे.

ओम राऊत (Om Raut) याच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा 16 जून 2023 रोजी रिलीज झाला होता. या सिनेमात प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. सिनेमा रिलीज होताच डायलॉग, व्हीएफएक्स आणि पात्रांच्या लूकवरून वादाच्या भोवऱ्यात अडकला. सिनेमाला चांगली ओपनिंग मिळाली, पण नंतर सिनेमाच्या कमाईत प्रचंड घसरण होत गेली.

रिलीजपूर्वी ‘आदिपुरुष’ सिनेमाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते. प्रेक्षकही नव्या रूपात रामाची कथा पाहू इच्छित होते. त्याचमुळे या सिनेमाने पहिल्या दिवशी 84 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. मात्र, पहिल्या दिवसापासूनच सिनेमा वादात अडकला. त्यामुळे कमाईत घसरण होत गेली.

सिनेमाला प्रेक्षकांनी स्पष्ट नकार दिला आणि पहिल्या आठवड्यानंतर सिनेमाच्या कमाईत कमालीची घसरण झाली. सिनेमाने पहिल्या आठवड्यात 266.20 कोटी रुपये कमावले होते. मात्र, दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने 33.50 कोटींची कमाई केली. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात सिनेमा फक्त 4.80 कोटी रुपये कमावू शकला.

प्रभासच्या या सिनेमाच्या क्लोजिंग कमाईविषयी बोलायचं झालं, तर माध्यमांतील वृत्तांनुसार, सिनेमाने भारतात 305 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, जगभरात या सिनेमाने 353 कोटींची कमाई केली. सिनेमाचे बजेट तब्बल 600 कोटी रुपयांहून अधिक होते. यातील 150 कोटी रुपये हे साऊथ थिएटर अधिकार प्रभासच्या नावावर होते.

प्रभासचा सिनेमा प्रेक्षकांना खुश करू शकला नाही. मात्र, प्रभासला एका गोष्टीचे समाधान नक्की असेल. ‘आदिपुरुष’ सिनेमा प्रभासचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनला आहे. यापूर्वी ‘बाहुबली’ या सिनेमाचे दोन्ही भाग ब्लॉकबस्टर ठरले होते. तसेच, ‘साहो’ सिनेमाही 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाला होता.

ओटीटीवर केव्हा होणार रिलीज?
वादाच्या भोवऱ्यात अडकून अपयशी ठरलेला हा प्रभासचा सलग तिसरा आहे. त्यापूर्वी त्याचे ‘राधे श्याम’ आणि ‘साहो’ हे सिनेमेही चांगलेच आपटले होते. याव्यतिरिक्त ‘आदिपुरुष’ सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यासाठी तयार आहे. सिनेमा 1 ऑगस्ट रोजी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. प्रभासला आता यावर्षी रिलीज होणाऱ्या त्याच्या आगामी ‘सालार’ सिनेमाकडून आशा आहेत. ‘केजीएफ’ फेम प्रशांत नील यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमा 28 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. तसेच, 2024मध्ये प्रभासचा ‘प्रोजेक्ट के’ रिलीज होणार आहे. (adipurush worldwide closing box office collections prabhas kriti sanon starrer earns more than 300 crores read)

महत्त्वाच्या बातम्या-
रजनीकांत ते पवन कल्याण, ‘या’ 7 सुपरस्टार्सने लपवली खरी ओळख! प्रसिद्धीसाठी बदलले आपले नाव, पाहा यादी
क्या बात है! धोनीची पत्नी आहे 41 वर्षीय अभिनेत्याची Fan, पाहिलेत आतापर्यंतचे सगळे सिनेमे

हे देखील वाचा