Friday, May 29, 2026
Home बॉलीवूड इशान खट्टर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला, बियारिट्झ चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीमध्ये क्रिस्टन स्टीवर्टसोबत सामील

इशान खट्टर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला, बियारिट्झ चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीमध्ये क्रिस्टन स्टीवर्टसोबत सामील

अभिनेता इशान खट्टर (Ishan Khattar) हा हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्ट आणि इतर अनेक नामांकित व्यक्तींसोबत बियारिट्झ चित्रपट महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीच्या परीक्षक मंडळात सामील होणार आहे. ही घोषणा खुद्द चित्रपट महोत्सवानेच केली आहे. इशानसोबत फ्रेंच दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संपादक नॅथन अँब्रोसिओनी, फ्रेंच अभिनेत्री सुझी बेंबा, कॅनेडियन अभिनेत्री व्हिटनी पीक आणि इतरही उपस्थित राहणार आहेत.

इशान खट्टरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २०१८ मध्ये इराणी चित्रपट निर्माते माजिद माजिदी दिग्दर्शित ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ या त्याच्या पहिल्या चित्रपटाने झाली. त्यानंतर त्याने लिओनार्डो डिकॅप्रियो आणि जेनिफर लॉरेन्स अभिनीत २०२१ च्या ‘डोन्ट लुक अप’ या चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली.

२०२० मध्ये, त्याने मीरा नायर यांच्या ‘अ सूटेबल बॉय’ या ब्रिटिश मालिकेत तब्बूच्या विरुद्ध भूमिका साकारली. त्याचा २०२५ मधील ‘होमबाउंड’ हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेला होता आणि त्याला शॉर्टलिस्टही करण्यात आले होते.

कामाच्या आघाडीवर, इशान खट्टर शेवटचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘होमबाउंड’ या चित्रपटात दिसला होता. दोन मित्रांची कथा सांगणारा आणि जातीयवादासारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता.

कान्ससह अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाची खूप प्रशंसा झाली. नीरज घायवान दिग्दर्शित या चित्रपटात इशानसोबत विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये पलाश वासवानी दिग्दर्शित ‘जुगाडू’चा समावेश आहे. याशिवाय, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘द रॉयल्स’ या शोच्या दुसऱ्या सीझनवर काम सुरू आहे.

 

हे देखील वाचा