Sunday, July 14, 2024

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा चर्चेत, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने पुन्हा बजावले समन्स

जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कथित फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

ईडीच्या आरोपांनुसार, फसवणूक करून मिळवलेल्या या पैशाचा वापर जॅकलिनसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी केला गेला आहे. 2022 मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात असे म्हटले होते की जॅकलीन आपल्या गुन्हेगारी इतिहासाविषयी माहिती असूनही ठग चंद्रशेखरने दिलेल्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि महागड्या भेटवस्तूंचा आनंद घेत होती.

या प्रकरणी आतापर्यंत जॅकलिनची किमान पाच वेळा चौकशी झाली आहे. प्रत्येक वेळी अभिनेत्रीने आपण निर्दोष असल्याचे स्पष्ट केले आहे आणि चंद्रशेखरच्या कथित गुन्हेगारी कारवायांबद्दल तिला कोणतीही माहिती नाही.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जॅकलिन लवकरच फतेह नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सोनू सूदही आहे. याशिवाय ती वेलकम टू द जंगलमध्येही दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह अनेक मोठे स्टार्स मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

उदित नारायण यांच्या आवाजाने अंबानींच्या हळदी समारंभाला लावले चार चांद; गायली ही सुपरहिट गाणी
भुवन बाम बनला डीपफेकचा बळी, सट्टेबाजीच्या व्हिडिओमध्ये वापरला चेहरा

हे देखील वाचा