Friday, March 29, 2024

साऊथ सुपरस्टारसोबत धमाल करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस सज्ज; रिलीझ झाला चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’

हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेसृष्टी पाहते. लवकरच आलिया भट्ट ‘आरआरआर’ सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करणार आहे. आता या यादीत जॅकलिन फर्नांडिसचे नावही जोडले गेले आहे. बॉलिवूडमध्ये यशाची शिखरे पादाक्रांत करणारी जॅकलिन लवकरच साऊथ सिनेमांमध्ये दिसणार आहे.

जॅकलिनने नुकतीच तिच्या दाक्षिणात्य सिनेमाची घोषणा केली आहे. जॅकलिन सुपरस्टार किच्चा सुदीपसोबत ‘विक्रांत रोणा’ या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटांच्या निर्मात्यांनी जॅकलिनचा फर्स्ट लूक सर्वांसमोर सादर केला आहे. या सिनेमात जॅकलिन एका मस्त भूमिकेत दिसणार आहे. संपूर्ण मुंबईत तिच्या या लूकचे होर्डिंग प्रदर्शित करण्यात आले आहे. या होर्डिंगमधून ३D पॅन इंडिया फिल्मने जॅकलिनच्या रक़ील डी’कोस्टा उर्फ ​​गडंग रक्कम्मा ही भूमिका आणि लूक प्रदर्शित केला आहे. जॅकलिनच्या या लूकमध्ये अनेक जातींचे मिश्रण आहे. (Jacqueline Fernandez will be seen Vikrantarona poster released)

या सिनेमाच्या निर्मात्यांनी सांगितले की, “जॅकलिनच्या येण्यामुळे जगातील नव्या हिरोची गोष्ट अधिक रोमांचित करणारी ठरेल. सिनेमात ती खूप छान दिसत असून, तिची पहिली झलक सर्वांसमोर आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा सिनेमा पुढच्या अनेक पिढ्यांना नक्कीच लक्षात राहील.

जॅकलिन म्हणाली, “चित्रपटाच्या मेकिंगमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी रोमांचकारी होता. मी निर्मात्यांची खूप आभारी आहे. इतके मोठे आणि भव्य पोस्टर प्रदर्शन केले. हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय असणार आहे.”

‘विक्रांत रोणा’ हा हा एक ऍक्शन सिनेमा असणार आहे. तो १४ भाषांमध्ये ५५ देशात ३-डी मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनुप भंडारी दिग्दर्शित, जॅक मंजुनाथ आणि शालिनी मंजुनाथ (शालिनी आर्टस्) द्वारे निर्मित, अलंकार पांडियन (इन्वेनियो फिल्म्स) द्वारे सह-निर्मित, बी अजनीश लोकनाथद्वारे संगीतबद्ध असणार आहे. या सिनेमात किच्चा सुदीप, निरूप भंडारी, नीता अशोक, जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा