[rank_math_breadcrumb]

सतीश कौशिक यांच्या डेथ एनिवर्सरीनिमित्त जॅकी श्रॉफ यांनी वाहिली श्रद्धांजली; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक असलेले सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या डेथ एनिवर्सरी निमित्त अनेक कलाकारांनी त्यांची आठवण काढली. यावेळी अभिनेता जॅकी श्रॉफने सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली .

जॅकी श्रॉफने सोशल मीडिया अकाउंटवर सतीश कौशिक यांचे काही फोटो एकत्र करून कोलाज शेअर केला. पोस्टमध्ये त्यानी लिहिलं की“सतीश कौशिक जींची पुण्यतिथीनिमित्त आठवण येत आहे. त्याचबरोबर या कोलाजमध्ये सतीश कौशिक यांचे वेगवेगळ्या काळातील फोटो दिसत होते. त्यात त्यांचा एक हसरा फोटो देखील होता ज्यात त्यांनी कॅप आणि चष्मा घातला होता. तसंच त्यामध्ये त्यांच्या लहानपणीचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो सुद्धा होते.

त्याचबरोबर याआधी अभिनेता अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि तेव्हा त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की “वंशिकाच्या शाळेच्या कार्यक्रमाला पालकांसारखं उपस्थित राहणं आणि तिला शाळेच्या नुक्कड नाटकात अभिनय करताना पाहणं, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता.”ते पुढे म्हणाले की“काही वर्षांपूर्वी मी आणि सतीश दिल्लीमध्ये नुक्कड नाटकं करत होतो.”वंशिकाचं कौतुक करत त्यांनी लिहिलं की,“ती खूप टॅलेंटेड, मेहनती अभिनेत्री आहे.” तसेच शाळेचे आभार मानत तिच्या पुढच्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

सतीश कौशिक यांचे निधन कधी आणि कसे झाले तर ९ मार्च २०२३ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी सतीश कौशिक यांचे निधन झाले. मिळालेल्या वृत्तानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या असं अचानक जाण्याच्या बातमीमुळे संपूर्ण
चित्रपटसृष्टी मध्ये शोककळा पसरली होती. सतीश कौशिक यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तसच एक अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये विशेष स्थान निर्माण केल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

राहा आणि रणबीर कपूरने आलिया भट्टला महिला दिनानिमित्त दिले गोंडस सरप्राईज