Friday, December 8, 2023

जान्हवी कपूरचे बालपणीचे फोटो व्हायरल, दिसतीये एकदम स्वीट अँड सिंपल

सध्या बॉलिवूडमध्ये ओळखली जाणारी ‘धडक गर्ल’ हिचे फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. सध्या ‘धडक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते. त्यातच तिने आपल्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. पांढऱ्या फ्रॉकमध्ये मोठ्या डोळ्यांची गोड दिसणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून जान्हवी कपूर आहे.

बॉलिवूडमध्ये प्रत्येक अभिनेत्रीला एका वेगळ्या नावाने ओळखले जाते. सध्या जान्हवी कपूरला देखील ‘धडक गर्ल’ म्हणून ओळखले जात आहे. तिच्या अदा आणि तिचा अंदाज यामुळे ती खूप चाहत्यांची आवडती झाली आहे. धडक या चित्रपटातून तिने सिनेमामध्ये पदार्पण केले. त्यामुळे तिला बॉलिवूडची ‘धडक गर्ल’ म्हणून ओळखलं जात आहे. सध्या तिचा सोशल मीडियवर व्हायरल होत असलेला बालपणीच्या फोटोमध्ये तीला ओळखता देखील येणार नाही. (janhavi kapoor childhood photos viral)

जान्हवी कपूर ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. तिच्या बालपणीत ती फार मस्तीखोर होती. तिच्या शेअर झालेल्या फोटोवरून समजते. परंतु आता जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. जान्हवी खूप चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली. नुकतेच ती ‘मिली’ या सिनेमाचे शूट संपवून आली आहे. जान्हवी कपूर ‘गुडलक जेरी’, ‘दोस्ताना 2’, ‘मिस्टर अँड मिसेस’ या सिनेमांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तसेच तिचे चका चक हे गाणे देखील प्रदर्शित झाले आहे. तिच्या या गाण्याला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
2020 हे वर्ष ठरले सारा अली खानसाठी वाईट; अभिनेत्री म्हणाली, “माझं ब्रेकअप अन्…”

आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा