कंगणाच्या संकटात भर पडण्याची शक्यता; जावेद अख्तर यांनी अभिनेत्रीविरोधात कोर्टामध्ये दाखल केली याचिका


बॉलिवूडमधील नावाजलेले लेखक जावेद अख्तर यांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये जावेद अख्तर यांनी सांगितले आहे की, कंगनाने तिच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी कोर्टापासून काही गोष्टी लपवल्या आहेत. या सोबतच त्यांनी या याचिकेमध्ये सांगितले की, “जेव्हा कोर्टाने कंगनाला विचारले होते की, तिच्या विरोधात कोणती क्रिमिनल केस चालु आहे का?? यावर तिने नकार दिला होता आणि सांगितले होते की, तिच्या विरोधात केवळ दोनच केस चालू आहेत. परंतु तिने कोर्टाला हे नाही सांगितले की, मी देखील तिच्या विरोधात मानहानीची केस केली आहे. जी आता मजिस्ट्रेट कोर्टामध्ये पेंडींग आहे.” (Javed Akhtar moves bombey high court alleging mis leading statement by kangana Ranaut for passport renewal)

कंगना रणौतने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर, एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केले होते. तेव्हा जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगना रणौत हिच्याविरुद्ध मानहानीची केस दाखल केली होती. त्यानंतर १ मार्चला कंगनाच्या विरोधात जामिन वॉरंट दाखल केला होता. २५ मार्चला तिला बेल मिळाली होती. परंतु ही केस अजूनही पेंडिंग आहे.

कंगना रणौत या दिवसात तिचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या शूटिंगसाठी बुडापोस्ट येथे गेली आहे. २८ जून रोजी तिने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या सुनावणीमध्ये सांगितले होते की, तिच्या विरोधात कोणतीच क्रिमिनल केस पेंडीग नाहीये. पासपोर्टचे नूतनीकरण होण्यामुळे कंगना शूटिंगवर उशिरा पोहचली होती. कंगना आता शूटिंग करत आहे, पण जावेद अख्तर यांनी केलेल्या या याचिकेमुळे तिच्या संकटात भर पडू शकते.

कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या तिच्या ‘धाकड’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात ती अर्जुन राजपालसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा चित्रपट १ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे. या सोबतच ती ‘थलायवी’ आणि ‘तेजस’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.