आपल्या मोहक अंदाजाने बॉलिवूड तारकांना मागे सोडणारी ‘गोपी बहू’, जाणून घ्या तिच्याबद्दलच्या खास गोष्टी


छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध सून जिचा निरागसपणा पाहून आजकालच्या सासवांना वाटते की, मला हिच्या सारखीच सुंदर आणि सुशील सून मिळावी. ती अभिनेत्री म्हणजेच आपल्या मोहक अंदाजाने बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकत प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी ‘जिया मनेक’.

‘स्टार प्लस’ चॅनेलवरील वरील गोपी बहू या नावाने प्रसिद्ध असलेली जिया मनेकने नुकताच आपला ३५ वा वाढदिवस साजरा केला. पडद्यावर अतिशय सुसंस्कृत आणि साधी दिसणारी जिया ही आपल्या व्यक्तिगत आयुष्यात फारच धाडसी आणि सुंदर आहे. चला मग जाणून घेऊयात तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.

जियाचा जन्म १८ फेब्रुवारी, १९८६ रोजी अहमदाबादमध्ये झाला. याच शहरातून तिने जाहिरात आणि विपणन क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने ‘ना घर के ना घाट के’ या हिंदी कॉमेडी चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. तिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली ती स्टार प्लस वाहिनीवरील “साथ निभाना साथिया’ या मालिकेतून. याच मालिकेतून ती सर्व प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या मालिकेतील एका निर्दोष आणि साध्या सुनेची भूमिका ही प्रेक्षकांना फारच आवडली. तिच्या ‘गोपी बहू’च्या पात्राच्या अभिनयाबद्दल तिचे कौतुक देखील तितकेच झाले.

गोपी बहुच्या भूमिकेत बरीच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर जियाने निर्मात्यासोबत झालेल्या विवादामुळे सन २०१२ मध्ये साथ निभाना साथिया या कार्यक्रमाला राम राम ठोकला. त्यानंतर तिचे पात्र देबोलीना भट्टाचार्य हिने साकारले. या कार्यक्रमानंतर ती कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या प्रसिद्ध डान्स रिऍलिटी शो मध्ये देखील दिसली. त्यानंतर चार वर्षानंतर तिने साथ निभाना साथियामध्ये पुनरागमन केले.

यानंतर जिया सब वाहिनीवरील ‘जीनी और जूजू’ या कार्यक्रमात देखील तिने अली असगरसोबत भूमिका साकारली. या कार्यक्रमात तिच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली. तथापि तिने हा कार्यक्रमही काही कारणास्तव सोडला. दुसऱ्या अभिनेत्रीला जियाच्या जागी निवडण्यात आले. परंतु प्रेक्षकांच्या नापसंतीमुळे हा कार्यक्रमदेखील बंद करण्यात आला. त्यानंतर ती ‘अजब गजब घर जमाई’, ‘मानमोहिमी’, ‘बडी दूर से आये है’ आणि ‘महासागर’ या कार्यक्रमात देखील भूमिका सादर करताना दिसली.

साथ निभाना साथियामधील प्रमुख भूमिकेमुळे तिला इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर तिच्या जीनी और जुजू या व्यक्तिरेखेला देखील पुरस्कार मिळाला.

जिया काही काळ छोट्या पडद्यापासून दूर राहिली. पण ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. तिचे फोटो चाहत्यांना खूपच पसंत पडत असतात. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचे घर विकत घेतले आहे. सोबतच तिने एका कारही खरेदी केली आहे. आपल्या घराचे फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच टाकत असते. सध्या आपले जीवन साध्या पद्धतीने ती व्यतीत करत असून लवकरच ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुन्हा दिसेल अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे.

जिया मनेक अभिनयाव्यतिरिक्त इतर सामाजिक कामांमध्ये देखील फार कार्यरत आहे. ‘स्माईल फाउंडेशन इंडिया’ चे ती समर्थन करत असून मुलींना योग्य शिक्षण मिळावे यासाठी ती प्रयत्न करत असते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘प्रेग्नंट वाटतीये!’ लग्नांनंतर प्रथमच समोर आलेल्या दियाला पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया; पाहा व्हायरल व्हिडिओ

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश


Leave A Reply

Your email address will not be published.