×

शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन भावाचा बदलला लूक, ‘कभी खुशी कभी गम’मधील लाडूला आता ओळखणेही झाले कठीण

टीव्ही इंडस्ट्री असो किंवा बॉलिवूड इंडस्ट्री मोठ्या कलाकारांसोबत बालकलाकारही आपल्या दमदार अभिनयाने आणि क्यूट अंदाजाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. चित्रपट किंवा पात्र कितीही जुने असले तरी कलाकार हा नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात असतो. अशाच काही बालकलाकारांनी ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती, जी व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणारे अनेक बालकलाकार आता तरुणांच्या ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. या चित्रपटातील रोहनची व्यक्तिरेखा तुम्हाला आठवत असेल, अतिशय गोलमटोल दिसणारा लहान रोहन आजही नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर उभा राहतो, इतकी उत्तम पद्धतीने त्याने ही भूमिका कविश मुझुमदारने साकारली होतो.  

शाहरुखच्या धाकट्या भावाचा नवा लूक पाहिला का?

‘कभी खुशी कभी गम’मध्ये शाहरुख खानच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत दिसणारा लाडू उर्फ ​​रोहन आता मोठा झाला आहे. नुकतेच रोहन उर्फ ​​कविशचे काही फोटो समोर आले आहेत. जे पाहून चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. एका युजरने कमेंट करून विचारले की, “हा तोच गोलू-मोलू लाडू आहे.” तर दुसरा युजर म्हणाला की, “तू किती बदलला आहेस.”

View this post on Instagram

A post shared by Kavish Majmudar (@skavi87)

वरुण धवनसोबत केले आहे काम 

शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि जया यांसारख्या सुपरस्टार्ससोबत ‘कभी खुशी कभी गम’मध्ये काम करूनही कविश मजुमदार बराच काळ चित्रपटात दिसला नाही. ‘कभी खुशी कभी गम’नंतर कविश अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब होता. त्यानंतर तो वरुण धवनच्या ‘मैं तेरा हीरो’ या चित्रपटात दिसला. याशिवाय त्याने रितेश देशमुखच्या ‘बँकचोर’ या चित्रपटातही काम केले आहे. त्याचबरोबर तो इमरान खानच्या ‘लक’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून दिसला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kavish Majmudar (@skavi87)

 

हेही वाचा :

Latest Post