‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीवच्या अदांवर चाहतेही झाले फिदा! व्हायरल होतोय व्हिडिओ

kahe diya pardes fame sayali sanjeev shared her video on social media goes viral


‘काहे दिया परदेस’ मालिकेत अभिनय करून अभिनेत्री सायली संजीव घरघरात पोहचली. अभिनयातील तिच्या निरागसतेने लाखो चाहत्यांना वेड लावले. अभिनेत्री आता सोशल मीडियावर सक्रिय राहून चर्चा रंगवत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते. नेहमीच तिच्या पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

अलीकडेच सायलीने शेअर केलेला एक व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका गाण्यावर अभिनय करत आहे, सोबतच नाचतही आहे. नाचतानाचे तिचे एक्सप्रेशन्स अगदी पाहण्यासारखे आहेत. तिचा गोंडस चेहरा पुन्हा एकदा नव्याने चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडत आहे.

सायलीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच व्हिडिओखाली कमेंट करून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, “एक दम झक्कास मॅडम.” दुसऱ्याने लिहिले, “खूपच सुंदर.” याशिवाय इतर चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट केले आहेत.

झी मराठी चॅनलवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने ‘गौरी’ची भूमिका साकारली होती. ‘गौरी’ची भूमिका साकारत अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीही पाऊल ठेवले. तिने ‘पोलिस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.