सिंघमच्या ‘काव्या’ला झालाय जीवघेणा आजार, करियर सांभाळत काजल अग्रवाल रोज लढतेय ‘या’ आजाराशी


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल साऊथ चित्रपटसृष्टीसोबत हिंदी सिनेसृष्टीमधे देखील खूप लोकप्रिय आहे. काजल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. काही महिन्यांपूर्वीच तिने लग्न केले आहे. काजल नेहमी सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक गोष्टी फॅन्ससोबत शेयर करत असते. सोमवारी काजलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली ती वाचून सर्वानाच धक्का बसला आहे.

काजलने तिच्याबद्दल एक गौप्यस्फोट केला आहे, ज्यात तिने तिला ‘ब्रोन्कियल अस्थमा’ असल्याचे सांगितले आहे. तिच्या या पोस्टवर फॅन्सकडून अनेक कमेंट्स येत आहे. तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे की, ‘या आजारामुळे तिला किती तडजोड करावी लागली, अनेक बंधनांना पाळावे.’

 

काजलने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” मी ५ वर्षांची असताना मला ब्रोन्कियल अस्थमा असल्याचे निदान झाले. तेव्हा मला डॉक्टरांनी खाण्या-पिण्याबाबत अनेक निर्बंध लादले. त्यात चॉकलेट्स, डेयरी प्रोडक्ट्स आदी गोष्टींचा समावेश होता. लहान मुलांना ह्या गोष्टी तर सर्वात जास्त आवडतात. मला हे नियम पाळणे खूपच मुश्किल होते. जस जशी मी मोठी होत गेली, तेव्हा मला या गोष्टी समजायला लागल्या. जेव्हा मी कुठे फिरायला, ट्रीपला जायची तेव्हा सर्दी, धूळ, धूर या गोष्टींमुळे मला खूप त्रास व्हायचा.”

“अस्थमाची लक्षणे दिसताच माझा श्वास दाबला जायचा. त्यामुळे मी इन्हेलर्स वापरायला सुरुवात केली . त्यामुळे माझ्या या परिस्थितीत खूप फरक पडला. मी नेहमी माझ्याजवळ इन्हेलर्स ठेवते. हे पाहून अनेक जणं मला खूप प्रश्न विचारायचे. आपल्या देशात अनेक लोकांना इन्हेलर्सची खूप आवश्यकता आहे, पण फक्त सामाजिक भीती मनात ठेऊन अनेक लोक इन्हेलर्स वापरणे टाळतात,” असेही ती पुढे म्हणाली.

“ज्यांना इन्हेलर्स वापरण्याशिवाय पर्याय नाहीये अशा लोकांनी किंवा अस्थमा रुग्णांनी वैयक्तिक आणि सार्वजनिक ठिकाणी इन्हेलर्स वापरताना लाज बाळगायची बिलकुल गरज नाही. याचा वापर करून तुम्ही समाजात पर्यायाने देशात जागरूकताच पसरवणार आहे. आजपासून #SayyesToInhalers मी माझ्या परिवाराला, मित्र, मैत्रिणी आणि जवळच्या लोकांना आवाहन करते की त्यांनी इन्हेलर्स वापरण्यासाठी लोकांना जारुक करावे,” या पोस्टच्या माध्यमातून तीने इन्हेलर्स वापराबाबत जनजागृतीही केली.

३५ वर्षीय काजलने क्यु हो गया ना, सिंघम, स्पेशल २६, दो लफ्जो की कहानी व मुंबई सागा या हिंदी सिनेमात काम केले आहे. तसेच तीने अनेक तेलुगू व तमिळ सिनेमात काम केले आहे. गेल्यावर्षी तीने लग्न देखील केले आहे.

मनोरंजन क्षेत्रातील मनोरंजक बातम्यांसाठी आमचं टेलिग्राम चॅनेल जॉइन करा येथे क्लिक करा…

हेही वाचा
– राकेश रोशनपासून ते सोनाली बेंद्रेपर्यंत कँसरचा सामना करणारे सेलिब्रिटी; या कलाकारांना गमवावा लागला जीव
– अजय देवगण ते विद्या बालन, या पाच सेलिब्रिटींनी आहेत दुर्धर आजार! तरीही अखंडपणे करतायत आपलं मनोरंजन!
– रामायणातील मेघनादची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे या गंभीर आजाराने झाले होते निधन; राजेश खन्ना यांच्याशी केली जायची तुलना

 


Leave A Reply

Your email address will not be published.