Friday, May 17, 2024

रामायणातील ‘मेघनाद’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे ‘या’ गंभीर आजाराने झाले होते निधन; राजेश खन्ना यांच्याशी केली जायची तुलना

रामानंद सागर यांच्या रामायणात रावणाचा महान मुलगा मेघनादची भूमिका साकारणारे विजय अरोरा हे त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी आपल्या चमकदार अभिनयाने मेघनादच्या व्यक्तिरेखेला जीवनदान दिले होते. रामायण मालिकेमुळे त्यांच्या कारकिर्दीत त्यांना बराच फायदा झाला. मंगळवारी (2 फेब्रुवारी) विजय अरोरा यांची पुण्यतिथी होती. यानिमित्ताने विजय अरोराच्या चित्रपट कारकीर्दीवर एक नजर टाकूया.

विजय अरोरा यांनी 1971 मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियामधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा पहिला चित्रपट ‘जरूरत’ होता. या व्यतिरिक्त त्यांनी जीनत अमानबरोबर ‘यादों की बारात’ या चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटाचे रोमँटिक हिट गाणे ‘चुरा लिया है तुमने’ हे त्यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्यात तपकिरी चेहरा असलेल्या विजय अरोराच्या स्टाईलने मुली त्यांच्यासाठी वेड्या झाल्या होत्या.

विजय अरोरा यांनी ‘जरूरत’, ‘जीवन ज्योति’, ‘राखी और हथकडी’, ‘आखिरी चीख’, ‘एक मुट्ठी आसमान’, ‘सबसे बडा सुख’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 110 चित्रपट आणि बर्‍याच मालिकांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांची मने जिंकली.

असे म्हणतात की, विजय अरोरा एकेकाळी इतके प्रसिद्ध झाले होते की त्यांची तुलना राजेश खन्ना यांच्याशी केली जात होती. त्यावेळी राजेश खन्ना यांनासुद्धा वाटू लागले की त्यांच्या लोकप्रियतेस धोका निर्माण झाला आहे. बर्‍याच हिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 1987 मध्ये रामानंद सागरची नजर विजय अरोरावर पडली. संपूर्ण कारकिर्दीत मेघनाद या भूमिकेसाठी त्यांची आठवण काढली जाते. त्यांनी हे पात्र इतके जोरदारपणे बजावले की आजही लोक त्यांच्यात मेघनादची प्रतिमा पाहतात.

सन 2007 मध्ये पोटाच्या कर्करोगामुळे 62 व्या वर्षी त्यांनी जग सोडले. लॉकडाऊनमध्ये रामायण प्रसारित झाले, तेव्हा विजय अरोरा स्वत:ला पाहायला आपल्यात नव्हते. मात्र, त्यांच्या अभिनयामुळे ते नेहमी त्यांच्या चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील.

हेही वाचा-

बापरे! तब्बल ३०० कोटींमध्ये बनणार ‘रामायण’ चित्रपट, पाहा कोण साकारणार राम-सीतेचे भूमिका

रामायणातील ‘या’ कलाकारांचा मृत्यू दुर्दैवी, बिबीशन बनलेल्या कलाकाराचा मृतदेह सापडला रेल्वे रुळाजवळ

पडद्यावर माता ‘सीता’ची भुमिका साकारलेल्या ‘या’ ५ अभिनेत्री; प्रेक्षकांच्या मनात आजही आहे आदर

हे देखील वाचा