×

प्रेग्नन्सीच्या काळातही काजल अग्रवालने केला जिममध्ये व्यायाम, सोबतच दिल्या ‘या’ दिवसांमध्ये फिट राहण्याच्या टिप्स

मनोरंजनविश्वात स्वतःला फिट ठेवणे खूपच आवश्यक आहे. चांगले दिसण्यासोबतच उत्तम फिटनेससाठी देखील योग्य व्यायाम करणे आणि फिट राहणे महत्वाचे आहे. आपण अनेकदा अभिनेत्रींना त्यांच्या प्रेग्नन्सीच्या काळातही व्यायाम करताना बघतो. या काळात अभिनेत्रांच्या व्यायामाचे फोटो, व्हिडिओ तुफान चर्चा खेचतात. प्रेक्षकांना याबद्दल त्यांचे कौतुकही वाटते. लवकरच काजल अग्रवाल आई होणार आहे. काजल तिचा हा प्रवास खूपच एन्जॉय करत असून, या दिवसांमध्ये ती सोशल मीडियावरून सतत तिचे विविध अनुभव शेअर करताना दिसते. काजल अनेकदा तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे तिचे फोटो शेअर करत असते. नुकताच तिने स्वतःचा जिममध्ये व्यायाम करत असतानाच एक फोटो शेअर केला असून, हा फोटो इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे.

काजोलने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा व्यायामाचा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रेग्नन्सीमध्ये केले जाणारे व्यायाम ती या व्हिडिओमध्ये करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी नेहमीच खूप सक्रिय राहिली असून, मी माझ्या एवढ्या आयुष्यात नेहमीच वर्कआऊट केले आहे. ज्या महिलांना प्रेग्नन्सीमध्ये कोणत्याही समस्या नाही त्यांनी त्यांच्या या दिवसांमध्ये एरोबिक आणि स्ट्रेंथ कंपडीशनिंग एक्सरसाइज केली पाहिजे, किंबहुना हे करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित देखील केले गेले पाहिजे. याशिवाय काजलने तिचा एक लाल साडीतील सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सच्या भरभरून कमेंट्स आणि लाईक्स देखील येत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मॉमी ट्रेनिंग’.

काजलने तिच्या एका पोस्टमध्ये तिच्या या सुंदर दिवसातील अनुभव सांगताना लिहिले की, “मी सध्या त्या शक्तींबद्दल जाणून घेत आहे, ज्यांच्याबद्दल मला माहिती नव्हती. सोबतच मी भीतीला हरवण्याची कौशल्य देखील शिकत आहे.” काजलने याआधी तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो देखील शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत गौतम किचलू आणि तिच्या कुटुंबासोबत दिसत आहे. काजलने तिच्या एका पोस्टमधून प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढण्यावरून ट्रोल करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर दिले होते.

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तुफान लोकप्रिय असणाऱ्या काजल अग्रवालने बॉलिवूडमध्ये देखील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीला आघाडीची अभिनेत्री असून, एका सिनेमासाठी ती एक ते दोन कोटी रुपये घेते.

हेही वाचा  –

Latest Post