Saturday, April 18, 2026
Home बॉलीवूड काजोलने मोकळ्या केसातील फोटो शेअर मागितली माफी; म्हणाली, ‘…मी तुम्हाला ऐकू नाही शकत’

काजोलने मोकळ्या केसातील फोटो शेअर मागितली माफी; म्हणाली, ‘…मी तुम्हाला ऐकू नाही शकत’

कलाकार आणि फॅन्सच्या संपर्काचे महत्वाचे माध्यम म्हणून सोशल मीडियाचे नाव येते. सध्या सोशल मीडियाचे महत्व तुफान वाढताना दिसत आहे. सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि फॉलोवर्स पाहून कलाकारांची कास्टिंग होत असल्याचे देखील वृत्त ऐकण्यात आहे. एकूणच काय तर सोशल मीडिया हे आजच्या मनुष्याच्या गरजांपैकी एक महत्वाची गरज बनली आहे. कलाकार याच सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ, मतं, अपडेट पोस्ट करून फॅन्सपर्यंत पोहचवतात. इंडस्ट्रीमधील अगदी मोजके कलाकार सोडले, तर सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. चर्चेत राहण्याच्या दृष्टीने ते अनेकदा अनेक पोस्ट शेअर करत असतात. मागच्या काही काळापासून सिनेसृष्टीमधे एक नवीन ट्रेंड आला आहे. ज्यात कलाकार त्यांचे जुने फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. याच ट्रेंडला ‘थ्रो बॅक’ असे नाव आहे.

याच थ्रोबॅक ट्रेंडमध्ये बॉलिवूडची सर्वात बबली, प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजोलने देखील तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. तिचा हा फोटो पाहूनच लक्षात येते की, हा फोटो ९० च्या दशकातील आहे. या फोटोमध्ये काजोलने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून, कानात मोठे झुमके आणि केस मोकळे सोडले आहेत. यातील काही केस तिच्या कानावर देखील आहे. त्यामुळेच काजोलने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “माफ करा, केसांच्या मोठ्या बटांमुळे मी तुम्हाला ऐकू शकत नाही.”

काजोलची ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून फॅन्स यावर अनेक कमेंट्स करत आहे. फॅन्स तिला, गॉर्जियस, स्टनिंग, ब्युटीफुल अशा उपमा देत आहेत. काजोलचा हा फोटो पाहिला तर लक्षात येईल की, तिची सुंदरता आणि तिच्यातली प्रतिभा ही अजूनही जशीच्या तशीच आहे. किंबहुना ती आता जास्त वाढलेली आहे. काजोल सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा