Saturday, November 23, 2024
Home टेलिव्हिजन भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर काम्या पंजाबीचे वक्तव्य; म्हणाली, ‘मी कोणाच्या बापाला…’

भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर काम्या पंजाबीचे वक्तव्य; म्हणाली, ‘मी कोणाच्या बापाला…’

गेल्या दोन महिन्यापासून कॉंग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रामुळे सतत चर्चेत असतात. आता हा दौरा उत्तप्रदेशमध्ये जाऊन ठेपला आहे. यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि सामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातही भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद लाभला त्याशिवाय लाखोंच्या संख्येने लोकांनी हजेरी लावली होती. आता उत्तर प्रदेशमधील या यात्रेला टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी हिने  देखिल हजेरी लावली आहे. (दि, 4 डिसेंबर) रोजी काम्या यात्रेमध्ये सहभागी झाली होती.

समाजिक घटनांवर सतत आपले परखड मत मांडणारी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Panjabi) हिने देखिल उत्तर प्रदेशमधील भारत जोडो यात्रे (Bharat Jodo Yatra)ला हजेरी लावली होती. राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काम्या पंजीबीचा भारत जोडो यात्रेचा व्हिडिओ कॉंग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. “अन्याय व तिरस्काराच्या विरोधात उठणारी पावलं भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. यामुळे आमची शक्तीही वाढत आहे.” असं कॅप्शन देत काम्याने देखिल आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार गेल्या वर्षीच काम्याने कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून तिने आपल्या पक्षाविषयी निष्ठासुद्धा दाखवली होती. त्याशिवाय अभिनेत्रीने यात्रेचा अनुभव आणि त्यामागील उद्दिष्ट्य स्पष्ट केले आहेत. माध्यमांशी संवाद साधत असताना अभिनेत्रीने सांगितले की, “बऱ्याच लोकांना या यात्रेत सहभागी होण्याची इच्छा आहे, पण त्यांना लोकांच्या टीका आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना करावा लागेल या भीतीपोटी ते या यात्रेत सहभागी होणार नाही.”

 

View this post on Instagram

 

काम्या पुढे म्हणाली की, “या यात्रेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी सगळ्यांशी संवाद साधतात, सगळ्यांना ते आपलं मानतात. मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही. राहुल गांधींना समर्थन द्यायला मला कसलीच भीती वाटत नाही. यात्रेदरम्यान त्यांच्याशी वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा झाली आणि त्यांना भेटून फार आनंद झाला.”

 

View this post on Instagram

 

काम्याच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे अभिनेत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत यापूर्वी देखिल टीव्हीवरील अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai), आकांक्षा पुरी (Akansha Puri), अमोल पालेकर (Amol Palekar), आणि अभिनेत्री पुजा भट्ट (Pooja Bhatt) सारखे प्रसिद्ध कालाकर सामिल झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अखेर गुपित उघड! प्राजक्ताची नवी झेप, ‘प्राजक्तराज’ नावाने सुरु केला ‘हा’ व्यवसाय
जबरा फॅन! राजेश खन्नांना भेटण्याच्या इच्छेने इरफान खान यांनी लढवली होती ‘ही’ शक्कल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा