Sunday, April 26, 2026
Home बॉलीवूड संजय कपूरच्या मृत्यूवर कंगना रणौतचा विश्वासच बसेना, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

संजय कपूरच्या मृत्यूवर कंगना रणौतचा विश्वासच बसेना, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूर ज्या पद्धतीने मृत्यू झाला त्यावर कंगना रणौतला (kangana Ranaut) विश्वास बसत नाहीये. खरं तर, बिझनेस कन्सल्टंट सुहेल सेठ यांनी संजय कपूरच्या मृत्यूच्या बातमीवर सविस्तर भाष्य केले आहे. त्यांनी एएनआयला सांगितले की, संजय कपूरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, जो इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान मधमाशी गिळल्यामुळे झाला. हीच गोष्ट कंगनाला त्रास देत आहे. कंगनाने संजय कपूरच्या मृत्यूवर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहिले की, ‘ही आणखी एक अविश्वसनीय घटना आहे. संजय कपूर (करिश्मा कपूरचा माजी पती) पोलो ग्राउंडवर होता, तेव्हा एक मधमाशी त्याच्या तोंडात गेली (हो, पोलो ग्राउंडवर एक मधमाशी) त्याला चावली आणि त्याची श्वासनलिका बंद झाली, त्याला श्वास घेता येत नव्हता म्हणून त्याने खेळ थांबवण्यास सांगितले पण त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. ही खूप दुःखद बातमी आहे.’

कंगना राणावत पुढे लिहिते, ‘याशिवाय, मी २०२५ आपल्या आयुष्यात आणणाऱ्या सर्व विचित्र घटना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वजण सुरक्षित रहा आणि देवाला प्रार्थना करत रहा.’ अहमदाबादमधील विमान अपघातामुळे कंगना आधीच दुःखी होती. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचेही या अपघातात निधन झाले. कंगनाने त्यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संजय कपूरच्या निधनाची बातमी आल्यानंतर करिश्मा कपूरच्या घरीही दुःखाचे वातावरण आहे. करिश्मा आणि संजय कपूरचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलांमुळे ते एकमेकांना भेटत असत. करिश्माला आधार देण्यासाठी तिची बहीण करीना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान देखील रात्री उशिरा अभिनेत्रीच्या घरी पोहोचले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

असं होतं करिष्मा आणि संजय कपूर यांचं नातं; घटस्फोट झाल्यावरही दोघे…
पुढील आठवड्यात हे इंग्रजी सिनेमे गाजवणार मार्केट; सुपरमॅन पासून द फॅन्टास्टिक फोर होणार प्रदर्शित…

हे देखील वाचा