Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन कपिल शर्मानेने केला ‘टीप टीप बरसा पाणी’ गाण्यावर डान्स, रविना टंडन म्हणाली, ‘आगच लावली’

कपिल शर्मानेने केला ‘टीप टीप बरसा पाणी’ गाण्यावर डान्स, रविना टंडन म्हणाली, ‘आगच लावली’

कपिल शर्मा हा त्यांच्या टॅलेटने प्रत्येकाला हसवण्याचा प्रयत्न करतो. तो मंचावर असताना कोणीही आपले हसणे थांबवू शकत नाही. कपील शर्मा शोची चर्चा तर नेहमीच असते. तो सोशल मीडियावरही खूपच सक्रिय असतो. त्याच्या सुमधूर आवाजाने तो सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकतो त्याचा आवाजही खूप सुंदर आहे. फक्त भारतातच नाही तर पूर्ण विश्वात त्याचे चाहते आहेत. नुकताच त्याचा आणि फराह खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात ते दोघे डान्स करताना दिसत आहे. त्यानी त्याच नृत्य कौशल्य दाखवले आहे. तो रवीना टंडनचा ‘टिप टिप बरसा पानी’ या प्रसिद्ध गाण्यावर तो नृत्य करताना दिसला आहे. त्याचा हा व्हिडिओ चक्क रवीना टंडनने शेअर केला आहे.  

हा डांन्स व्हिडिओ त्याच्याच कॅामेडी शोच्या सेटवर घडलेला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत फराह खानही दिसत आहे. दोघेही रवीना टंडनचा ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत रविनाने लिहले की, “जेव्हा फराह आणि कपिलने पाण्यामध्ये आग लावली, आग लावली. या गाण्यात रवीनाही त्या दोघांमध्ये डान्स करण्यासाठी येते. रवीना ‘केजीएफ 2’ मध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत संजय दत्तही दिसणार आहे. अशा चर्चा रंगल्या आहेत ‘केजीएफ ‘ पेक्षा ‘केजीएफ 2’ हा मोठा चित्रपट असल्याच सांगितले जात आहे. हा चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

कपिलही त्याच्या नवीन ‘फंकार’चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तो त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत असतो. कपिल मुलाचा बाप बनला आहे. त्याच्या मुलाच नाव त्रिशान आहे आणि मुलीच नाव अनायरा आहे. त्याला त्याच्या परिवारासोबत वेळ घालवाला खूप आवडतो.

हेही वाचा 

हे देखील वाचा