चर्चा तर होणारच! मौनी रॉयने केला पारदर्शक टॉपमधील मादक लूकचा व्हिडिओ शेअर; पडतोय कमेंट्सचा पाऊस


अभिनेत्री त्यांच्या अभिनयातून तर सर्व प्रेक्षकांना घायाळ करतच असतात, सोबतच त्यांच्या वेगवेगळ्या फोटोशूटमधून देखील त्या फॅन्सला वेड लावतात. अभिनेत्री बऱ्याचदा त्यांचे विविध प्रकारचे फोटोशूट करत असतात. याच फोटोशूटमधील काही फोटो अभिनेत्री सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी शेअर करतात. सोशल मीडियावर सर्वच अभिनेत्री मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. याच सक्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.

मौनी नेहमी तिच्या वेगवेगळ्या फोटोशूटमुळे ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. वेगवेगळे फोटोशूट करणे आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे हा जणू तिचा एक छंदच बनला आहे. नुकतेच मौनीने तिचे एक शानदार फोटोशूट केले आहे. या फोटोशूट दरम्यानचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

काळ्या रंगाच्या पारदर्शक टॉपमध्ये दिसणारी मौनी अतिशय हॉट दिसत आहे. या रिव्हिलिंग ड्रेसमध्ये ती तिच्या घायाळ करणाऱ्या अदा या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. ब्लॅक टॉप, ब्लॅक पॅन्ट मोकळे केस या अवतारात दिसणारी मौनी सर्वांनाच वेड लावत आहे. तिच्या या लूकमध्ये तिचे मादक डोळे फॅन्सला अधिक आकर्षित करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ किंवा तिचे हे फोटोशूट नक्की कसले आहे. याबद्दल अजूनपर्यंत तिने कोणताही खुलासा केला नाहीये. मात्र, तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियाचे तापमान नक्कीच वाढवत आहे.

अतिशय कमी वेळात तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. शिवाय यावर फॅन्स आणि कलाकारांच्या एक से बढकर एक दमदार कमेंट्स देखील वाचायला मिळत आहेत. यात कलाकार देखील तिच्या या व्हिडिओला पसंती देताना दिसत आहेत. अभिनेत्री शमिता शेट्टीने देखील यावर कमेंट करत फायर इमोजी पोस्ट केले आहेत.

टीव्हीपासून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात करणाऱ्या मौनीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीची ‘नागिन’ ही ओळख मिळवलेल्या मौनीने तिचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला. अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ सिनेमातून पदार्पण करणाऱ्या मौनीने कमी काळात स्वतःचे नाव बॉलिवूडमध्ये निर्माण केले. लवकरच मौनी आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.