Friday, March 29, 2024

कपिल शर्मा पुन्हा दिसणार सिनेमात?, ‘ड्रीमगर्ल’ सिनेमाच्या दिग्दर्शकासोबत करणार काम

कपिल शर्मा नाव उच्चारले की डोळ्यासमोर येते ती कॉमेडी. कपिल आणि कॉमेडी या आता एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या आहेत. कपिलने त्याच्या हजरजबाबीपणामुळे आणि कॉमेडीमुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘द कपिल शर्मा’ हा शो कपिलमुळे आणि कपिल या शोमुळे तुफान गाजले. या शोच्या माध्यमातून कपिल प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत असतो. मात्र आता कपिल एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे समजत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार कपिल शर्मा आणि दिग्दर्शक राज शांडिल्य यांची चांगली आणि जुनी मैत्री आहे. या दोघांनी कॉमेडी सर्कसच्या सेटवर सोबत काम केले. एका मुलाखतीदरम्यान राज शांडिल्य यांनी सांगितले की, अजूनपर्यंत काहीच ठरलेले नाही. ते आणि कपिल शर्मा सतत एकमेकांच्या संपर्कात असून एक सिनेमा बनवण्याचे ठरवत आहे. मात्र अजूनपर्यंत असे काहीच ठरले नाही ज्याबद्दल त्यांनी मीडियाला माहिती द्यावी. ते आणि कपिल यांना अतिशय वेगळ्या आणि अजूनपर्यंत कधीही न झालेल्या विषयावर सोबत काम करायचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

राज शांडिल्य यांनी या मुलाखतीदरम्यान भूषण कुमार यांच्याबद्दल देखील भाष्य केले आहे. त्यांच्या डोक्यात काही कल्पना आहेत ज्यांना भूषण कुमार यांना निर्मित करायच्या आहेत. राज शांडिल्य यांनी हे देखील सांगितले की, त्यांना असे काही प्रयोग करायचे आहेत जे चित्रपटांमध्ये अजून झालेले नाही. ते म्हणाले की ते आणि कपिल शर्मा लवकरच एकत्र काम करतील आणि तो सिनेमा भूषण कुमार प्रोड्युस करतील.

तत्पूर्वी कपिल शर्माने याआधी देखील चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा पहिला सिनेमा होता, ‘किस किसको प्यार करू’ जो २०१५ साली प्रदर्शित झाला ओटा. या सिनेमा चांगला चालला.. त्यानंतर त्याचा दुसरा सिनेमा होता, ‘फिरंगी’ जो फ्लॉप ठरला. आता तो नंदिता दास यांच्या ‘ज्विगाटो’ सिनेमात काम करताना दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्येष्ठ रंगकर्मींवर झाडू मारण्याची वेळ, अंशुमनने व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप
‘ते कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केले’, म्हणणाऱ्या हेमांगी कवीची शाहरुख खानबद्दलची ‘ती’ पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा