Monday, July 15, 2024

जरा इकडे पाहा! एकता कपूर शॉर्ट्स घालून मंदिरात पोहोचली, व्हिडिओ पाहून यूजर्स चांगलेच भडकले

टीव्ही क्वीन एकता कपूर नेहमीच तिच्या मालिका आणि वेब सीरिजमुळे चर्चेत असते, पण काहीवेळा ती वेगवेगळ्या कारणांमुळेही चर्चेत येते. नुकतीच एकता कपूर एका मंदिराला भेट देण्यासाठी आली होती, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एकता कपूरचे कपडे आणि तिची वागणूक पाहून चाहते प्रचंड संतापलेले दिसत आहेत. सोशल मीडियावर तिला जोरदार ट्राेल देखील करत असल्याचे बघायला मिळत आहे.

एकता कपूर झाली ट्रोल 
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चित्रपट आणि मालिका निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) शॉर्ट्स घालून मंदिरात आल्याचे दिसत आहे. ती आत जाते व तिचे बूट बाहेर काढत ती पुढे जाते. तिच्यासोबत असलेली व्यक्ती हाताने चपला व्यवस्थित ठेवते. या सर्व गोष्टी युजर्सना आवडल्या नाहीत आणि लोकांनी एकामागून एक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

एकता कपूरचे हे वागणे यूजर्सना आवडले नाही
एकता कपूरचा हा व्हिडीओ समाेर आल्यानंतर एका युजरने कमेंट करत लिहिले की, “मूर्ख मुलगी….. तुला कपडे घालण्याची पद्धत किंवा शिष्टाचार नाही.” तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, “असे कपडे घालून येण्यासाठी हे जिम सेंटर नाही, हे मंदिर आहे.” त्याचप्रमाणे इतर अनेक युजर्स देखील तिच्या कपड्यांबद्दल कमेंट करताना दिसले.

एकता कपूरच्या कराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर एकताने ‘कहानी घर घर की’ , ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ , ‘बेकाबू’ , ‘लॉक अप’ अशा दमदार मालिकेमधुन खूप काही मिळवले आहे. अशा परिस्थितीत, तिच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे आणि तिला आलिशान जीवनशैली जगणे आवडते, हे नाकारता येणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
दिवाळी पार्टीत दिसले नाही दीपिका अन् रणवीर, पुन्हा उडू लागल्या विभक्त होण्याच्या अफवा!

अमृता फडणवीसांचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, दिवाळीनिमित्त भक्तीत झाली तल्लीन

हे देखील वाचा