Saturday, September 30, 2023

‘कठीण परिस्थितीत वडील रणधीर कपूर नव्हते आमच्यासोबत…’, करीनाने केला सुरुवातीच्या काळातील संघर्षाचा खुलासा

बॉलिवूडमधील नावजलले घराणे म्हणजे ‘कपूर’ घराणे होय. या घराण्यातील मुलींना चित्रपटसृष्टीत काम करण्याची अजिबात परवानगी नव्हती, पण करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश करून या सगळ्या रूढी परंपरा तोडून टाकल्या. दोघीही आज बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन हा प्रवास पूर्ण करणे काही सोप्पी गोष्ट नव्हती. यासाठी त्यांना अनेक कठीण प्रसंगातून जावे लागले होते. करीना कपूरने तिच्या एका मुलाखतीत या तिच्या संघर्षाचा खुलासा केला आहे.

त्यांच्या या कठीण काळात त्यांची आई बबिता यांनी दोघींनाही खूप मदत केली. मुलींचे करिअर करण्यासाठी त्यांनी खूप गोष्टींचा सामना केला आहे. करीनाने तिच्या मुलाखतीत सांगितल की, “जेव्हा मी आणि करिश्मा मोठे होत होतो, तेव्हा आम्ही आमचे वडील रणधीर कपूर यांना खूप कमी वेळा पाहिले. आमच्या आईने अनेक काम करून आमचं पालन पोषण केले आहे.”

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत करीनाने त्यांच्या वडिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यावेळी करीनाला विचारले की, कपूर परिवाराने त्यांना आर्थिक मदत केली होती का? यावर तिने उत्तर दिले की, “आम्हाला आमच्या परिस्थितीतच सोडून दिले होते. परंतु आम्ही आमच्या वडिलांसोबत नेहमी वेळ घालवत होतो. सुरुवातीच्या दिवसात ते आमच्यासोबत जास्त नसायचे, पण आता आम्ही कुटुंबाप्रमाणे राहतो.”

करीनाने सांगितले की, “त्यावेळी कपूर कुटुंबाने आम्हाला मदत केली नाही. आमची आर्थिक स्थिती देखील चांगली नव्हती. आमच्या आईने अनेक छोटे मोठी काम करून आम्हाला वाढवले आहे. चित्रपटात येण्याआधी आमची परिस्थिती हालाखीची होती.”

तिने पुढे सांगितले की, “नुकतेच आमच्या वडिलांनी म्हटले आहे की, ते मुंबईतील चेंबूर येथील घर विकून आणि माझ्या आणि करिश्माच्या शेजारी बांद्रामध्ये राहायला येणार आहेत.”

करीना कपूरची आई बबिता देखील एक अभिनेत्री होत्या. पण रणधीर कपूर यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांच्याशी लग्न केले. परंतु कपूर घराच्या नियमानुसार त्यांनी चित्रपटसृष्टीला सोडून दिले. परंतु लग्नाच्या 15 वर्षानंतर ते वेगळे राहू लागले. मात्र, कायद्याने त्यांचा घटस्फोट झाला नव्हता.(kareena kapoor khan suffering from poverty before coming film industry)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच दिवशी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ‘शहजादा’ने केली तब्बल इतक्या काेटींची कमाई; वाचून तुम्ही व्हाल थक्क

प्राजक्ता माळी झाली ‘या’ नवीन संघटनेची सदस्य, सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करत दिली माहिती

हे देखील वाचा