बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेतील कलाकारांबद्दल प्रत्येक गोष्टीबद्दल चर्चा होते. जसे की, ते काय खातात, काय परिधान करतात, ते कोणाला भेटतात आणि कोणाशी भांडतात. या सर्व गोष्टी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये असते. चाहत्यांच्या अशा प्रेमामुळे, कदाचित कलाकारांनाही यशामुळे घमंडी होतात. आपल्या सुंदर रुपाने आणि मोहक अदा दाखवून कलाकार प्रत्येकाचे हृदय जिंकणारे हे कलाकार आपल्या नखऱ्यांमुळे चर्चेत येतात. यामध्ये एक दोन नाही, तर अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या या स्वभावामुळे ओळखले जातात. या लेखातून आपण या कलाकारांबाबत जाणून घेणार आहोत.
करीना कपूर खान
बॉलिवूडची ‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान होय. करीना कोणाबद्दल काहीही बोलण्यास किंवा तिचे स्पष्ट विचार व्यक्त करताना मागचा पुढचा विचार करत नाही. ती इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाची इच्छा होती की, तिने फक्त ए-लिस्टर्स कलाकारांसोबत काम करावे. अशा परिस्थितीत करीना फक्त त्या चित्रपटांची तयारी करायची, ज्यामध्ये दिग्गज अभिनेते भूमिका साकारताना दिसतील. दरम्यान, याबाबत अनुराग कश्यप यांनी एकदा सांगितले की, “करीनाने चित्रपटात काय आहे ते पाहावे, कोण आहे ते नाही.”
कॅटरिना कैफ
बॉलिवूडची ‘बार्बी डॉल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कॅटरिना कैफ होय. कॅटरिनाचे नखरे काही कमी नाहीत. अगदी लहान गोष्टीवरुनही तिला प्रचंड राग येतो. तिच्या तांडवांची यादीही काही लहान नाही. कॅटरिना समजूतदार आहे, पण ती चिडली तर पूर्ण गोंधळ उडवून देते. एकदा कॅटरिना एका फ्लाइट अटेंडंटवर खूप मोठ्याने ओरडली होती. कारण, त्याने तिला सीट बेल्ट बांधण्यासाठी जागेवरून उठवले होते.
सलमान खान
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सलमान खान होय. सलमान नेहमीच कोणाच्याही मदतीसाठी कायम उभा असतो. दरम्यान, सलमानही प्रचंड नखरे करतो. सलमान ‘एक था टायगर’च्या शूटिंगसाठी वेळेत पोहचला नव्हता, त्यामुळे सर्व टीमला बराच काळ थांबायला लावले होते. मात्र, सलमानला स्वतःला इतर कोणाची वाट पाहायला अजिबात आवडत नाही. तो फक्त एक टेक देतो आणि तीच फायनल करावी लागते.
आयुष्मान खुराना
कोणत्याही चित्रपटाची पार्श्वभूमी नसताना चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावलेल्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे आयुष्मान खुराना. त्याने स्वतःला जे सिद्ध केले आहे, त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मात्र, असे म्हटले जाते की, ‘विक्की डोनर’च्या यशानंतर आयुष्माननेही बरेच नखरे दाखवायला सुरूवात केली. त्याने कुणाल कोहलीच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण, त्याला एका दिग्गज नायिकाविरुद्ध खलनायकाची भूमिका साकारायची होती.
कपिल शर्मा
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन अभिनेता म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा होय. कपिलविषयी बोलताना अनेकदा असे म्हटले जाते की, तो यश कधीच सांभाळू शकत नाही. जेव्हा कपिल आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचला होता, तेव्हा त्याने केलेल्या वर्तनाचे अनेक किस्से समोर आले. एकदा कपिलने चाहत्यांसोबत सेल्फी घेण्यास नकार दिला होता.
एवढेच नाही, तर त्याने अनेक मोठ्या सेलिब्रिटींनाही त्याच्या शोमध्ये वाट पाहायला लावली होती, ज्यामुळे बरीच खळबळ उडाली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य