Friday, May 1, 2026
Home बॉलीवूड हातात बादली अन् मग घेऊन करीना चाललीय तरी कुठं? फोटो होतोय जोरदार व्हायरल

हातात बादली अन् मग घेऊन करीना चाललीय तरी कुठं? फोटो होतोय जोरदार व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही खूप वेळा सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या व्यावसायिक आयुष्यातील घटनांवरून, तर कधी तिच्या वैयक्तिक गोष्टींवरून चर्चेत असते. केवळ करीनाचे नाही, तर तिची दोन मुले तैमूर आणि जेह हे देखील स्टारकीड म्हणून खूप लोकप्रिय असतात. करीना जिथे कुठे दिसेल, तिथे पॅपराजी नेहमीच तिचे फोटो काढण्यासाठी येत असतात. तिचे असे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच तिचा असा एक फोटो व्हायरल झाला आहे, जो पाहून सगळेजण हैराण झाले आहेत. फोटोमध्ये करीनाच्या हातात काही अशा गोष्टी दिसत आहेत, ज्या बघून तिच्या चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

करीना कपूर खान ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. करीना कधी सैफ अली खानसोबत, तर कधी कधी तैमूर आणि जेहसोबत ती स्पॉट होत असते. अशातच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात कॉफी मग, बादली आणि मग दिसत आहे. परंतु आपण जर तिचा हा फोटो नीट पाहिला, तर आपल्याला सत्य समजेल. (kareena kapoor roaming off with a bucket and mug photos goes viral on social media)

या फोटोमध्ये करीनाच्या हातात केवळ कॉफीचा मग दिसत आहे. त्याचवेळी मागे एका व्यक्तीच्या हातात बादली आणि मग आहे. परंतु हा फोटो काढण्याचा टायमिंग असा झाला आहे की, बघणाऱ्याला असे वाटते की, तिच्याच हातात बादली आणि मग आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्यांच्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अगदी साध्या पोशाखात दिसत आहे. तसेच तिने काळ्या रंगाचा चष्मा देखील लावला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी करीनाचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामुळे ती खूप ट्रोल झाली होती. या व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाचे जॅकेट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली होती. तसेच पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते. यावेळी तिच्या जॅकेटची चेन उघडी राहिली होती. ज्यामुळे तिची ब्रा दिसत होती. त्यामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम फ्रिडा पिंटो लवकरच होणार आई, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

-प्रतिक्षा संपली! ‘भाईजान’ने जाहीर केली ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, टिझर पाहूनच चाहते खुश

-मोठी बातमी! ईडीकडून नोरा अन् जॅकलिनला समन्स; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणी अभिनेत्रींची कसून चौकशी

हे देखील वाचा