करीनापासून ते श्रीदेवींपर्यंत, प्रेग्नेंसीमध्येही ‘या’ अभिनेत्रींनी सोडली नाही शूटिंग, पाहा यादी

वेळेनुसार बॉलिवूडमध्ये खूप काही बदल झाले आहेत. पहिले लग्नानंतर अभिनेत्रींचे करियर संपले, असे मानले जात होते. आता तर आई झाल्यानंतर देखील अभिनेत्री मोठ्या उत्साहात चित्रपट करत आहेत. एवढेच नाही, तर प्रेग्नन्सीच्या काळात अभिनेत्री बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतात. काही अभिनेत्रींनी प्रेग्नन्सीच्या कठीण काळात देखील शूटिंग सोडले नाही. करीना कपूर खान ते नेहा धूपिया यांसारख्या बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांनी प्रेग्नन्सीमध्ये आपले प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत. (kareena kapor khan to neha dhupia bollywood actress continue shooting during pregnancy)

नेहा धूपिया
नेहा धूपियाने अलिकडेच सांगितले आहे की, “लेबर पेन आणि कांन्ट्रॅक्शनमध्ये मी ‘सनक’ चित्रपटाची शूटिंग केली होती. मला हेच वाटलं होतं की, जर मला चान्स मिळत असेल तर तो सोडायचा नाही.” तसेच तिने ‘सनक’ चित्रपटात एक पोलीस ऑफिसरची रफ -टफ भूमिका निभावली आहे.

करीना कपूर खान
यासोबतच करीना कपूर खानने आपल्या दोन्ही प्रेग्नन्सीच्या वेळी शूटिंग केली होते. दुसरा मुलगा जेहच्या जन्माच्या आधी तिने आपल्या आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ आणि काही एंडोर्समेंटसाठी शूटिंग केले होते.

काजोल
तसेच या यादीमध्ये काजल देवगणचे देखील नाव आहे. कारण तिने तिच्या प्रेग्नन्सीच्या अडचणींची पर्वा न करता चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. ती तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान ‘वी आर फॅमिली’ चित्रपटाचे शूटिंग आणि प्रमोशन हे दोन्ही करताना दिसली होती.

जूही चावला
जूही चावला तिच्या ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ या चित्रपटादरम्यान प्रेग्नेंट होती. एवढेच नाही तर मीडिया रिपोर्टनुसार, ‘झंकार बीट्स’चे शूटिंगही प्रेग्नेंसीमध्येच पूर्ण झाले होते.

हेमा मालिनी
बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी जेव्हा ‘रझिया सुल्तान’ या चित्रपटाचे शूटिंग करत होत्या, तेव्हा त्या देखील प्रेग्नेंट होत्या. हेमा आणि धर्मेंद्र यांची पहिली मुलगी ईशा देओल तेव्हा जन्माला येणार होती. हेमा यांनी त्यांचा चित्रपटातील भाग पूर्ण निष्ठेने पूर्ण केला होता.

जया बच्चन
प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन या आता चित्रपटांपासून दूर असतील, पण प्रेक्षक त्यांचा अभिनय आजपर्यंत विसरले नाहीत. त्या हिंदी सिनेमा ब्लॉकबस्टर फिल्म ‘शोले’ च्या शूटिंग दरम्यान प्रेग्नेंट होत्या. त्यावेळीस त्यांच्या पोटात अभिषेक होता.

श्रीदेवी
श्रीदेवी या जेव्हा ‘जुदाई’ चित्रपटाचे शूटिंग करत होत्या, त्यावेळेस जान्हवी कपूर त्यांच्या पोटात होती. कदाचित ही गोष्ट कोणाला माहीत नसेल. तसेच ‘जुदाई’ चित्रपटाचे शूटिंग प्रेग्नन्सी दरम्यानच पूर्ण केले होते.

कोंकणा सेन शर्मा
कोंकणा सेन शर्मा ‘मिर्च’ आणि ‘राइट या रॉंग’ या सिनेमांच्या शूटिंग दरम्यान प्रेग्नेंट होती. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याबरोबरच तिने चित्रपटाचे प्रमोशनही देखील केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

Latest Post