Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॉलिवूडचा हॅंडसम हंक कार्तिक आर्यन झळकतोय ‘या’ नवीन अवतारात, जाणून घ्या एका क्लीकवर

बॉलिवूडचा हॅंडसम हंक म्हणुन ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यन हा ‘भुल भुलैया 2‘ पासून चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र, सध्या कॉमेडी चित्रपट ‘हेरा फेरी 3‘ मध्ये कार्तिक झळकणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. मात्र, अभिनेता सुनील शेट्टी याने सांगितले की, असं काहीच नाही, चित्रपट निर्माता कार्तिकला वेगळ्याच प्रेजेक्टसाठी घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आपल्या ‘अनटाईटल चित्रपट’ (नाव निश्चित नसलेला चित्रपट) साठी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) करत असून दिग्दर्शन कबीर कान (Kabir Khan) द्वारे केले जाईल. पहायला गेलं तर कार्तिक रोमांटिक आणि कॉमेडी चित्रपटांसाठी जास्त ओळखला जोतो. मात्र, आता अभिनेता एका नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 31 वर्षीय अभिनेता आपल्या आगामी येणाऱ्या चित्रपटासाठी एकदम तयार झाला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार कार्तिक येणाऱ्या चित्रपटामध्ये त्याची भूमिका जरा हटके असणार आहे. त्याशिवाय अभिनेत्याने त्याची तयारी देखिल सुरु केली आहे. त्याने आपल्या वर्कआउटमध्ये बदल केले आहेत तो जिममध्ये खूप मेहनत घेत आहे. कार्तिकसाठी ही भूमिका आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे अभिनेत्याने राजकोटमध्ये ट्रेनर राहुल भट्ट (Rahul Bhatt) याच्यासोबत ट्रेनिंग घेण्याची सुरुवात केली आहे. दंगल चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान याला देखिल याच ट्रेनर ट्रेन केले आहे.

 

View this post on Instagram

 

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्याचा नावीन चित्रपट ‘फ्रेडी‘ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये आर्यन एका खतरनाक डॉक्टरच्या भूमिकेत झळकला होता. यामध्ये आर्यनसोबत मुख्य भूमिकेत अलाया फर्नीचरवाला (Alaya F) पाहायला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
शालिन आणि एमसी स्टॅनच्या भांडणाने बिग बॉसच्या घराला बसला धक्का, ‘या’ अभिनेत्रीमुळे पेटली वादाची ठिणगी
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या सेटवर चंपक चाचाचा मोठा अपघात, पुन्हा परतणार का मालिकेत?

हे देखील वाचा