Friday, April 19, 2024

कॅटरिनाने दिली तमिळनाडूमधील शाळेला भेट, अभिनेत्रीच्या आईचे ‘हे’ आहे खास कनेक्शन

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्याशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते. त्याचबरोबर कॅटरिना कैफचे फॅन पेजही तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. सध्या तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, ती शालेय विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. कॅटरिना कैफचा हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे आणि आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना कैफ (Katrina Kaif) तामिळनाडूच्या मदुराई येथील माउंटन व्ह्यू स्कूलमध्ये पोहोचली, या शाळेत पोहोचल्यानंतर कॅटरिना कैफने शाळेतील मुलांसोबत खूप मस्ती केली. रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना कैफची आई सुझान देखील याच शाळेत शिक्षिका आहे. आईच्या शाळेत पोहोचल्यानंतर कॅटरिना कैफने मुलांसोबत साऊथच्या हिट गाण्यावर मलम पिट्टा पिट्टा डान्स केला. यावेळी कॅटरिना अगदी सिंपल लूकमध्ये दिसली. तिने कुर्ता घातला होता आणि थोडासा मेकअप केला होता. पण, अगदी साध्या शैलीतही कॅटरिना कमालीची दिसते.

कॅटरिना मुलांसोबत स्टेप्स जुळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमधील तिच्या हसण्यावरून, ती या मुलांसोबत चांगला वेळ घालवत आहे, याचा अंदाज लावता येतो. व्हिडिओमध्ये तिची स्टाइल अजिबात सुपरस्टारसारखी दिसत नाही. खुल्या केसांमध्ये आणि साध्या कुर्तीमध्येही कॅटची ही स्टाईल खूपच सुंदर दिसत होती.

कॅटरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती शेवटची 2021 मध्ये रिलीज झालेल्या रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामा फिल्म ‘सूर्यवंशी’मध्ये दिसली होती. यामध्ये अक्षय कुमारसोबत तिची जोडी जमली होती. कॅट लवकरच मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर 3’मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. याशिवाय कॅटरिना कैफकडे सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत ‘फोन भूत’ हा आगामी चित्रपट आणि विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘मेरी ख्रिसमस’ देखील आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- लाजीरवाणे! साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं न शोभणारं कृत्य; मुलाखतीवेळी कॅमेरा बंद करून महिला एँकरला…
जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
इंडियन आयडॉलवर संतापले प्रेक्षक, थेट बॉयकॉट करण्याची केली मागणी

हे देखील वाचा