‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिसला कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज, स्टनिंग लूकने केले सर्वांना क्लीन बोल्ड

 

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ आपल्या मोहक अदा आणि घायाळ करणाऱ्या लूकमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नवनवीन फोटो ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या कॅटरिना तिच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. त्यासाठी ती सोशल मीडियावर चित्रपटासंदर्भात फोटो शेअर करत आहे. सोबतच ती दिग्दर्शक रोहित शेट्टी सोबत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द बिग पिक्चर’ कार्यक्रमात देखील दिसली होती. यावेळी तिने केलेल्या लूकची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

बॉलिवूड अभिनेञी कॅटरिना कैफ सध्या अक्षय कुमार सोबतच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. त्यासंबंधी नुकताच एक खास व्हिडीओ कॅटरिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधील कॅटरिनाच्या स्टनिंग आणि मादक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. नुकतीच कॅटरिना मुंबईच्या समुद्र किनारी फोटोशुट करताना दिसली.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कॅटरिनाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ती मुंबईच्या समुद्रकिनारी फोटोशुट करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये कॅटरिना खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. पांढर्‍या रंगाचा वन शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये कॅटरिनाने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना क्लिन बोल्ड केले आहे. हलका मेकअप आणि मोकळे सोडलेले केस यामुळे कॅटरिना आणखीनच खुलून येत आहे. या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी तिला छान छान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तत्पूर्वी, सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॅटरिना दिग्दर्शक रोहित शेट्टी सोबत रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ कार्यक्रमात ही दिसून आली होती. यावेळी सुद्धा कॅटरिनाच्या सौंदर्याने सगळ्यांना मोहित केले होते. रोहित शेट्टी आणि कॅटरिना कैफचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हायरल व्हिडीओमध्ये कॅटरिना दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत माध्यमांशी बोलताना दिसत आहे. यावेळी साडीमध्ये दिसणार्‍या कॅटरिनाने आपल्या मोहक सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर दिग्दर्शक रोहित शेट्टी सुद्धा कुर्ता आणि पायजमा घालून खूपच हँडसम दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान कॅटरिना कैफ सध्या अभिनेता विकी कौशल सोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना विकीने आम्ही लवकरच साखरपुडा करणार आहोत अस सांगितल होत. या बातमीमुळे कॅटरिना आणि विकी कौशलच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दादा, तू माझे जग आहे’, म्हणत बॉबी देओलने बहिणींसोबतचा फोटो पोस्ट करत सनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो

-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे

Latest Post