Thursday, November 14, 2024
Home अन्य तब्बल १६ भाषांत २५ हजारांपेक्षा जास्त गाणी, जाणून घेऊयात एकेवेळी आपल्या आवाजाने प्रेमवीरांना घायाळ करणाऱ्या गायिकेबद्दल

तब्बल १६ भाषांत २५ हजारांपेक्षा जास्त गाणी, जाणून घेऊयात एकेवेळी आपल्या आवाजाने प्रेमवीरांना घायाळ करणाऱ्या गायिकेबद्दल

कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म एका तमिळ परिवारात झाला आहे. त्यांचं बालपणीच नाव शारदा हे होते. कविता ह्या जेव्हा 8 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांनी एका गायन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेमध्ये त्यांना पहिला क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता .

नामांकित गायक कविता कृष्णमूर्ती यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 25 जानेवारी 1958 रोजी दिल्ली येथे झाला. कविता कृष्णमूर्ती यांनी अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहे.

कविता कृष्णमूर्ती यांनी त्यांचे पहिले गाणे ‘गाणकोकिळा ‘ लता मंगेशकर यांच्या सोबत 1971 मध्ये गायले होते. त्यांच्या करीयरमध्ये त्यांनी 25 हजारपेक्षाही जास्त गाणी 16पेक्षा जास्त भाषांमध्ये गायली आहेत.

ही त्यांच्या आवजाचीच जादू आहे की, आजही त्यांची गाणी ऐकल्यावर प्रेक्षक स्वतः ला थिरकण्यपासून थांबवू शकत नाही.

कविता कृष्णमूर्ती यांना जेव्हा 8 वर्षाची असताना पहिला गायनाचा पुरस्कार मिळाला होता, तेव्हाच त्यांनी स्वप्न पाहिले होते की त्या मोठं होऊन एक नामांकित गायक व्हायचं आहे.

कविता कृष्णमूर्ती यांनी मुंबईतील ‘सेंट जेविअर’ या महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्याच दरम्यान कविता यांनी वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता. याच काळात नामांकित गायक ‘ मन्ना डे ‘ यांनी एका कार्यक्रमात कविता यांचे गाणे ऐकले आणि एका जाहिरातीमध्ये गाण्याची संधी दिली .

कविता कृष्णमूर्ती पुढे जाऊन बॉलिवूडच्या दिग्गज गायकांपैकी एक बनल्या. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलोय त्यांची काही सदाबहार गाणी, ज्यांची जादू आजही लोकांच्या मनावर राज्य करते.

 

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा