पती रसिक दवे यांनी दिलेली शिकवण आठवून भावूक झाली केतकी; म्हणाली, ‘शो मस्ट गो ऑन!’

हिंदी आणि गुजराती भाषेतील अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसलेले अभिनेता रसिक दवे (Rasik Dave) यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते अनेक दिवसांपासून आजारी होते. किडनी निकामी झाल्याने त्यांनी शुक्रवारी (२९ जुलै) रात्री अखेरचा श्वास घेतला. रसिक दवे यांच्या निधनानंतर आता त्यांची पत्नी आणि अभिनेत्री केतकी दवे (Ketaki Dave) हिने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने रसिक दवे यांच्या निधनानंतर तिचे आयुष्य किती बदलले आहे, हे सांगितले आहे. तिची ही मुलाखत कुणाचेही डोळे ओलावायला पुरेशी आहे.

केतकी दवेने सांगितले की, तिची आणि तिच्या कुटुंबाची प्रकृती सध्या ठीक नाही. तिचे पती कधीही नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू इच्छित नव्हते आणि सकारात्मक विचारांचा आग्रह धरत होते. रसिकला आपल्या आजाराविषयी बोलणे आवडत नसल्याचे अभिनेत्रीने सांगितले. “त्यांना या आजाराबद्दल कधीच बोलायचे नव्हते. ते अतिशय वैयक्तिक मनाचे व्यक्ती होते. ते नेहमी म्हणत असत की, सर्व काही ठीक होईल. मी माझे काम चालू ठेवावे, असे ते नेहमी म्हणायचे.” (ketki dave reveals his pain after husband rasik dave death)

केतकी दवेने सांगितले की, तिला एक नाटक सुरू करायचे होते, पण काही कारणास्तव ते करू शकले नाही. तेव्हा ती रसिक दवे यांच्याशी बोलली. नाटक सुरू करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे केतकीने रसिकला सांगितले. प्रत्युत्तरात, रसिक त्यांच्या पत्नीला म्हणाले की, द शो मस्ट गो ऑन. रसिकने शेवटच्या वेळीही केतकीला असेच म्हटले होते. केतकी पुढे म्हणाली की, “मला रसिककडून मिळालेल्या धाडसामुळे मी सर्व काही व्यवस्थित करू शकले. आज माझ्या कुटुंबात आई, मुलं, सासू-सासरे सगळे आहेत, पण तो नाही आणि मला त्यांची खूप आठवण येते.”

त्याचबरोबर केतकी दवेबद्दल सांगायचे तर ती अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. याशिवाय ती गुजराती फिल्म इंडस्ट्रीचाही एक भाग आहे. तिची आई सरिता जोशी एक अभिनेत्री असून त्यांचे दिवंगत वडील प्रवीण जोशी हे देखील थिएटर दिग्दर्शक होते. तिला एक धाकटी बहीण पूरबी जोशी आहे, जी एक अभिनेत्री आणि अँकर देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

Latest Post