Friday, September 20, 2024
Home टेलिव्हिजन तू वजन कसं कमी केलंस ? अक्षयच्या प्रश्नावर भारतीचे गमतीदार उत्तर…

तू वजन कसं कमी केलंस ? अक्षयच्या प्रश्नावर भारतीचे गमतीदार उत्तर…

कलर्स टीव्हीवर प्रसारित होणारा ‘लाफ्टर शेफ’ हा शो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. शो दरम्यानचा हशा आणि मस्ती प्रेक्षकांना खूप आकर्षित करत आहे. अंकिता लोखंडे, विकी जैन, जन्नत जुबेर, अर्जुन बिजलानी, करण कुंद्रा, कश्मिरा शाह, कृष्णा अभिषेक, निया शर्मा आणि सुदेश लाहिरी असे अनेक स्टार्स या शोमध्ये दिसले आहेत. हा शो प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग होस्ट करत आहे. नुकतीच ‘खेल खेल में’ चित्रपटाची टीमही शोमध्ये प्रमोशन साठी आली होती. 

शोच्या सेटवर अक्षय कुमार त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘खेल खेल में’ या चित्रपटाच्या स्टारकास्टसह पोहोचला होता. यामध्ये वाणी कपूर, फरदीन खान, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल यांचा समावेश होता. शो दरम्यान सर्वांनी खूप धमाल केली. त्याचवेळी अक्षय आणि भारती यांच्यातील रंजक संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अक्षयने भारतीला मिठी मारली आणि तिचे वजन कमी केल्याबद्दल तिचे कौतुक केले.

अक्षय म्हणतोय की, भारतीच्या वजन कमी झाल्याने तो खूप प्रभावित झाला आहे. भरतीच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. तो म्हणाला, “तुला पाहून मी खूप प्रभावित झालो आहे, एक पूर्ण भारतीच तुझ्यातून बाहेर पडली आहे. खूप छान. आजकाल तू  काय करत आहेस ?” यावर भारती गमतीने म्हणाली, “मला माहित नाही, सर्व काही सामान्य आहे. मुलाच्या जन्मानंतर माझे वजन कमी झाले आहे. मुलगा आतली सर्व चरबी घेऊन आला आहे. त्यानंतर माझं वजनच  वाढत नाहीये.” यावर सगळे जोरजोरात हसू लागले.

मुदस्सर अजीज दिग्दर्शित ‘खेल खेल में’ हा सात मित्रांच्या कथेवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटात, सर्व मित्र रात्रीच्या जेवणासाठी एकत्र येतात आणि नंतर एक मनोरंजक ट्रूथ गेम खेळण्याची योजना आखतात. चित्रपटात भरपूर कॉमेडी आहे, जी प्रेक्षकांनाही आवडली आहे. या चित्रपटानंतर अक्षय कुमार ‘वेलकम टू जंगल’मध्येही दिसणार आहे. याशिवाय तो ‘सिंघम अगेन’ आणि ‘जॉली एलएलबी 3’मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

इब्राहीम खानच्या चित्रपटाचे शूटिंग रद्द; सुरक्षेच्या मुद्द्यावरून निर्मात्यांनी घेतला निर्णय…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा