पाण्यात आग लागताना कधी पाहिली आहे का? नसेल तर हा पाहा नेहा धुपियाचा जबराट व्हिडिओ

Actress Neha dhupiya shared her swimming pool video with husband Angad bedi


बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसत आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती तिच्या चाहत्यांसोबत जोडून राहते. ती तिच्या अनेक आगामी चित्रपट आणि प्रोजेक्टबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती देत असते. त्याचबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलकही शेअर करत असते.

नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदी या दोघांमधील प्रेम संपूर्ण जगाला माहितच आहे. ते एकमेकांची खूपच काळजी घेताना दिसत असतात. त्यांच्या प्रेमाचा खुलासा करण्यासाठी ते दोघे एकही संधी सोडत नाहीत. ते नेहमी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यातच नेहाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये ती पती अंगद बेदीसोबत स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

नेहा आणि अंगद स्विमिंग सूटमध्ये पाण्यात मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ते दोघे एकमेकांची कंपनी खूप एन्जॉय करत आहेत. या सोबतच ते व्यायाम करत आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूपच धमाल करत आहे. हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये आहे.

या व्हिडिओमध्ये नेहा आधी कॅमेरा समोर येऊन व्हिडिओ चालू करते. त्यानंतर ते दोघे स्विमिंग पूलमध्ये व्यायाम करायला सुरुवात करतात. यामध्ये अंगद आणि नेहा दोघेही एकानंतर एक असे व्हिडिओ समोर येऊन व्यायाम करताना दिसत आहे. यामध्ये नेहाने लाल रंगाचा स्विमिंग सूट घातला आहे. ज्यामध्ये ती पाण्यात आग लावताना दिसत आहे. अंगदने निळ्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत नेहाने असे कॅप्शन लिहिले आहे की, “माझ्या नवऱ्यासोबत वर्क आऊट.” नेहाने 10 मे 2018 मध्ये अंगदसोबत लग्न केले होते. हे लग्न दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये झाले होते. लग्नात त्यांचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्र मंडळी आले होते. अंगद हा देखील एक अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावणारी ‘सपना चौधरी’, तिच्या ‘तेरे ठुमके’ गाण्याला आजही मिळतेय प्रेक्षकांची पसंती

-भोजपुरी गाण्याचा जलवा! सुपरस्टार राकेश मिश्राचं नवीन गाणं यूट्यूबवर करतंय धमाल; एकदा पाहाच

-‘सैयां जी’ गाण्यावर थिरकली निया शर्मा, पण ‘मजा नाही आली ताई’ म्हणत युजर्सने उडवली खिल्ली


Leave A Reply

Your email address will not be published.