Wednesday, June 18, 2025
Home बॉलीवूड मला त्याच्यासोबत काम करताना छान वाटतं, वेदांग रैना बद्दल खुशीचा मिडिया समोर खुलासा …!

मला त्याच्यासोबत काम करताना छान वाटतं, वेदांग रैना बद्दल खुशीचा मिडिया समोर खुलासा …!

अभिनेता वेदांग रैना आणि खुशी कपूर (Khushi kapoor) सध्या चर्चेत आहेत. दोघेही गेल्या वर्षी ‘द आर्चीज’मध्ये एकत्र दिसले होते. त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. खुशी आणि वेदांग एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरत आहेत. काल रात्री खुशी आणि वेदांग डिझायनर गौरव गुप्ताच्या लेटेस्ट कलेक्शन अरुणोदयसाठी शोस्टॉपर्स बनले. याचदरम्यान खुशी वेदांग बद्दल मीडियाशी बोलताना दिसली.

जेव्हा खुशी कपूरला विचारण्यात आले की तिला वेदांगसोबत पुन्हा काम करायला आवडेल का.तेव्हा ती म्हणते की, ‘हो, मला त्याच्यासोबत पुन्हा चित्रपट करायला नक्कीच आवडेल. त्याच्यासोबत काम करताना मला चांगलं वाटतं.

पुढे ती म्हणते कि, ‘मला असे वाटते की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखता तेव्हा तुम्ही त्याच्याशी सहजतेने वागता. यामुळे गोष्टी सोप्या होतात आणि तुम्ही जास्त घाबरत नाही. मला वाटते की आरामदायी वातावरणात चुका कमी होतात.

शोदरम्यान खुशी कपूर ऑफ-शोल्डर ब्लाउज, केप-स्टाइल स्लीव्हज आणि मर्मेड स्कर्टमध्ये दिसली होती. ती एखाद्या परीसारखी दिसत होती. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने महागडा नेकलेस घातला होता. त्या शोमध्ये तिच्यासोबत वेदांगही उपस्थित होता.

खुशीसोबत पुन्हा काम करण्याबाबत बोलताना वेदांग म्हणाला, ‘नक्कीच आम्हाला एकत्र अजून काम करायचे आहे. मला वाटते की आम्ही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो आणि आम्ही एकत्र खूप कम्फर्टेबल आहोत. सेटवरही आम्ही खूप आरामात एकत्र काम करतो. मला त्याच्यासोबत काम करायला मजा येते’.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

न्यूयॉर्कमध्ये एकटी फिरायला गेली ऐश्वर्या राय बच्चन; युजर्स म्हणले, ‘तिचा नवरा…’
‘अंगुरी भाभी’चा मान्सून लूक होतोय व्हायरल, पाहा फोटोस

हे देखील वाचा