Thursday, June 25, 2026
Home बॉलीवूड ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी? राजकुमार हिरानी यांनी दिले नवे अपडेट

‘3 इडियट्स’च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी? राजकुमार हिरानी यांनी दिले नवे अपडेट

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट “3 इडियट्स” (3 Idiots) च्या सिक्वेलबाबत अनेक तपशील समोर आले आहेत. ही माहिती खुद्द चित्रपटाच्या दिग्दर्शकाने दिली आहे.

व्हरायटी इंडियाच्या एका वृत्तानुसार, राजकुमार हिरानी यांनी खुलासा केला आहे की, चित्रपटाच्या कथेवर सध्या प्राथमिक काम सुरू आहे. त्यांनी आणि लेखक अभिजात जोशी यांनी मुंबईबाहेर यावर काम सुरू केले आहे. आमिर खानला चित्रपटाची मूळ कल्पना आवडली आहे, परंतु संपूर्ण पटकथा अद्याप तयार झालेली नाही. पुढील दोन महिन्यांत चित्रीकरण कधी सुरू होईल हे स्पष्ट होईल.

चित्रपटाची कथा जिथे संपली होती तिथूनच पुढे सुरू होईल, पण २० वर्षांच्या खंडानंतर, ती तीन पात्रं आता कॉलेजमध्ये नाहीत. ते आता आपापल्या नोकऱ्या आणि व्यवसायांमध्ये गुंतलेले आहेत. त्यांचं लग्न झालं असून त्यांना मुलं आहेत. इतक्या वर्षांनंतरचं त्यांचं आयुष्य या सिक्वेलमध्ये दाखवलं जाईल.

सोशल मीडियावर अशा अफवा पसरल्या होत्या की चित्रपटाचे नाव ‘4 इडियट्स’ असेल आणि त्यात एक नवीन अभिनेता सामील होईल. या अफवांना पूर्णविराम देत हिरानी यांनी स्पष्ट केले, “चित्रपटाचे नाव ‘4 इडियट्स’ नाही, आणि यात चौथा इडियटही नाही. ही ‘3 इडियट्स’चीच कथा आहे, फक्त २० वर्षांनंतरची.”

आमिर खानने यापूर्वी असेही म्हटले होते की, जर चित्रपटाची कथा पहिल्या चित्रपटासारखीच दमदार असेल तरच तो रांचोच्या भूमिकेत परत येईल. त्याला केवळ नावापुरता सिक्वेल बनवायचा नव्हता.

२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटात आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. करीना कपूर, बोमन इराणी आणि ओमी वैद्य हे देखील त्यांच्यासोबत दिसले होते. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

समंथाने शोभितावर साधला निशाणा? अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा