Friday, December 8, 2023

हृतिक रोशनच्या ‘या’ चित्रपटात कियारा अडवानीची एन्ट्री, ज्युनियरसोबत करणार स्क्रीन शेअर

अभिनेत्री कियारा अडवाणीने खूप कमी वेळात चित्रपटसृष्टीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. तिची बबली आणि बोल्ड स्टाइल चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. कियाराने तिच्या फिल्मी करिअरमध्ये ‘कबीर सिंग’, ‘गुड न्यूड’, ‘जुग जुग जिओ’ आणि ‘भूल भुलैया २’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. कियाराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. कियाराच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

कियारा सोशल मीडियावर सक्रिय असते. कियारा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे ती सतत चर्चेत येते. सध्या कियारा (Kiara Advani) तिचा अगामी चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ यामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट 29 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या आगोदर कियारा ‘वॉर 2’ चित्रपटात झळकणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर 2’ या चित्रपटात कियारा हृतिक रोशन आणि अभिनेता ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे.

स्क्रिनवर पहिल्यांदाच कियारा आणि हृतिक रोशन एकत्र दिसणार आहेत. ते दोघे मिळून प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहेत. आतापर्यंत कियाराने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2019 मध्ये आलेल्या वॉर चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. वॉर चित्रपटात टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनने सोबत स्क्रीन शेअर केली, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

अभिनेत्री कियारा अडवाणी विषयी बोलायच झाले तर, तिच्या चित्रपटांच्या लिस्टमध्ये ‘गुडन्यूज’, ‘गिलटी’, ‘इंदू की जवानी’, ‘लक्ष्मी’, ‘मशीन’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर कियारा अडवाणी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘गेम चेंजर’ चित्रपटात झळकणार आहे. कियाराने तिच्या 8 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये बॉलीवूडला 7 हिट चित्रपट दिले आहेत. ती वरुण धवनसोबत ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. (Kiara will be seen alongside Hrithik Roshan and actor Jr NTR in Ayan Mukherjee’s ‘War 2’)

अधिक वाचा-
आता सुट्टी नाही! पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरूष’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप

सनी लिओनी पुन्हा गाजविणार ‘बिग बॉस’चा मंच; कोणती भूमिका साकारणार, वाचा सविस्तर 

हे देखील वाचा