Monday, July 15, 2024

अधुरी एक कहाणी! सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे तुटली प्रेक्षकांच्या ‘सिडनाझ’ची जोडी

‘बिग बॉस १३’ चा स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला याचा गुरुवारी (२ सप्टेंबर) हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीला हादरा बसला होत्या. सर्वचजणं या बातमीवर शोक व्यक्त करताना दिसत आहेत. सिद्धार्थ आणि शहनाझ गिल यांची मैत्री खूप प्रसिद्ध होती. ते दोघेही ‘बिग बॉस १३’ मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यादरम्यान त्यांची मैत्री खूप घट्ट झाली होती. त्या दोघांचे अफेअर चालू आहे, अशा बातम्या देखील येत आहेत. सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉसमधील सर्वात चर्चेत असणारा स्पर्धक होता. अशातच आज म्हणजेच २ सप्टेंबर रोजी त्याची पहिली पुण्यतीथी आहे. 

सिद्धार्थ आणि शहनाझची केमिस्ट्री खूप लोकप्रिय होती. बिग बॉसमध्ये शहनाझ अनेकवेळा सिद्धार्थच्या बाजूने उभी राहत असायची. शोमध्ये दोघांची मैत्री घट्ट झाली होती. दोघेही एकमेकांची काळजी घ्यायचे.  दोघांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडायची. प्रेक्षकांनी त्या दोघांना ‘सिडनाझ’ हे नाव दिले होते. (siddharth shukla passed away his cute jodi with shehnaaz gill sidnaaz got broken fans are mourning his death)

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सिद्धार्थ आणि शहनाझ गिलने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले होते. नुकतेच ते दोघे एका हॉटेलमध्ये जेवायला देखील गेले होते. तेथील फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशा अनेकवेळा बातम्या आल्या होत्या परंतु त्यांनी कधीही त्यांच्या नात्याचा खुलासा केला नाही. ते दोघेही अनेकवेळा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असायचे. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘डान्स दीवाने ३’ या शोमध्ये उपस्थिती दर्शवली होती. तेथील फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘सिडनाझ’ हे बिग बॉसमधील एक लोकप्रिय जोडपे होते. प्रेक्षकांनी त्यांच्या जोडीला खूप प्रेम दिले होते.

सिद्धार्थ शुक्ला अभिनयासोबत सोशल मीडियावर देखील खूप लोकप्रिय होता. त्याने अनेक शोचे सूत्रसंचालन केले होते. यासोबत त्याने मॉडेलिंग देखील केले आहे. तसेच त्याने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. नुकतेच तो ‘ब्रोकन बट ब्युटीफुल 3’ नावाच्या वेबसिरीजमध्ये दिसला होता. यासोबत त्याने ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तो ‘खतरों के खिलाडी ७’ मध्ये दिसला होता. १२ डिसेंबर १९८० मध्ये जन्मलेल्या सिद्धार्थचा वयाच्या केवळ ४० व्या वर्षी मृत्यू झाला आहे. या बातमीने त्याच्या चाहत्यांवर दुःखाचे आभाळ कोसळले आहे. अनेकजण सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करून त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘तो डबल मिनींग मेसेज करायचा,’ अभिनेत्रीने केला होता सिद्धार्थ शुक्लावर गंभीर आरोप‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय सिद्धार्थ शुक्लाचं नाव; तर काजोलच्या बहिणीचाही आहे यादीत समावेश
कपिल शर्माची लागली लॉटरी, दाक्षिणात्य सुंदरीसोबत झळकणार ‘या’ चित्रपटात

 

हे देखील वाचा