Thursday, October 29, 2026
Home › मराठी › कोकण हार्टेड गर्लने इंस्टाग्रामवर चांगलेच सुनावले; लग्नासाठी मुंडावळ्या बनवल्याचा केला होता दावा

कोकण हार्टेड गर्लने इंस्टाग्रामवर चांगलेच सुनावले; लग्नासाठी मुंडावळ्या बनवल्याचा केला होता दावा

बिग बॉस मराठी 5 व्या सीजन मधून घराघरात पोहोचलेली स्पर्धक म्हणजे अंकिता प्रभू वालावलकर. (Ankita Prabhu Valavalkar) एक इन्फ्ल्युअन्सर म्हणून सुरुवात झालेला प्रवास एक सेलिब्रिटी म्हणून ती आता पूर्ण करत आहे. बिग बॉसच्या घरात असताना देखील अंकिता चांगलीच लोकप्रिय होती. त्याचप्रमाणे बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही ती तेवढीच लोकप्रिय आहे. बिग बॉसच्या घरात असताना ती लवकरच लग्न करणार आहे असे तिने सांगितले आहे. याबद्दल तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली होती. ती संगीत दिग्दर्शक कुणाल भगत याच्याशी फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्न करणार आहे. त्यामुळे दोघेही सध्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. अशा सोशल मीडियावर एक व्हिडिओ आहे, जो चर्चेत आला आहे.

अंकिता सध्या तिच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त असताना, इंस्टाग्रामवरील एका पेजवर अंकितासाठी मुंडावळ्या तयार केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. कीर्ती आर्ट अँड क्राफ्ट नावाच्या instagram पेजवर मुंडावळ्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. आणि या व्हिडिओवर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरच्या लग्नासाठी स्पेशल कस्टमर केअर युनिक आणि नाजूक अशा मुंडवळ्या असे लिहिलेले आहे. यासोबत त्यांनी अंकिताला देखील टॅग करा असे लिहिलेले आहे.

 

इंस्टाग्रामवरील हा व्हिडिओ अंकितापर्यंत पोहोचला आणि या व्हिडिओवर कमेंट करत अंकिताने लिहिले की, “मी फक्त एवढेच सांगेन की छान बिझनेस करा, पण खोटं बोलून करू नका मला खोटं बोलून माझं नाव वापरून बिजनेस केलेला मला अजिबात आवडणार नाही. मी तुमच्याकडून मुंडवळ्या घेतलेल्या नाहीत. जे आमच्या लग्नासाठी खरंच मेहनत करत आहे त्यांना क्रेडिट मिळू द्या.”

यामध्ये अनेक लोकांनी अंकिताची बाजू घेतली आहे. तर अनेक लोक असे म्हणत असेल की, त्यांना कदाचित अंकिताला या मुंडावळ्या गिफ्ट करायचा असतील. असे लिहिलेले आहे उगीच तिला टॅग करायला सांगितलं असे लिहिलेले आहे. परंतु अंकिताने या मुंडवळ्या मागितलेल्या नाही. असे सांगितले आहे. आता सगळेजण कुणाल आणि अंकिताच्या लग्नाची वाट पाहत आहेत. कुणाला देख कोकणातील आहे बऱ्याच वर्षापासून ते एकमेकांना ओळखतात. आनंदवारी या गाण्यात दोघेही एकत्र दिसले आहेत. आणि आता पुढील महिन्यात ते लग्न देखील करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

पूजा सावंतने थेट स्वामी समर्थांना लिहिले पत्र; मागितली ही खास गोष्ट
आलिया-दीपिकाने आपल्या मुलींना दिलेली नवीन वर्षाची भेट; करोडोत आहे किंमत

हे देखील वाचा